आदर्श शिक्षकेने वाढदिवसानिमित्त शाळेला कपाट व शैक्षणिक साहित्य भेट

आदर्श शिक्षकेने वाढदिवसानिमित्त शाळेला कपाट व शैक्षणिक साहित्य भेट 
 आलमला/ प्रतिनिधी -जि. प.कें. प्रा. शाळा आलमला येथील आदर्श शिक्षिका श्रीमती शोभा साहेबराव कदम यांचा दिनांक 12. 10.2023 रोजी वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या शाळेला सुंदर लोखंडी कपाट व 180 विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या लिखाणासाठी पेन वाटप केल्या आहेत. आज शासन जिल्हा परिषद च्या शाळा खाजगीकरणाकडे देऊ पाहत असताना आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये जाणीव ठेवून या शिक्षिकेने आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेला एक अनमोल भेट दिली आहे. अलमला गावातील असंख्य नागरिक त्यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी जिल्हा परिषद शाळेला वेगवेगळ्या आवश्यक वस्तू भेट देऊन एक आदर्श  गावामध्ये निर्माण करत आहेत . या चांगल्या उपक्रमाबद्दल आलमला जि .प. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवकुमार पाटील, उपाध्यक्ष विशाल वाघमारे ,सदस्य जावेद पटेल विजयकुमार कदम मु.अ.वामनराव राठोड,केंद्रप्रमुख नंदकिशोर कदम,तसेच त्यांच्या सहकारी श्रीमती कळशे मॅडम तिगीले मॅडम ,वाडकर मॅडम, सुरज स्वामी सर यांनी कदम मॅडमचे अभिनंदन केले सदरील शाळेतील सर्वच शिक्षक आपापल्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या गरजेनुसार वेगवेगळ्या वस्तू भेट देत आहेत.या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र या शाळेचे कौतुक होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم