लक्ष्मी अर्बन बँकेस बँको ब्लू रिबीन पुरस्कार २०२३ प्रदान
लातूर/ प्रतिनिधी-सहकार व बँकिंग क्षेत्रात उत्तमपणे दर्जेदार सेवा देणाऱ्या सहकारी बँकेस देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील मानाचा अविज पब्लिकेशन्स कोल्हापूर व गॅलक्सी ईनमा पुणे यांच्याकडून बँको ब्लू रिबीन पुरस्कार २०२३ हा नागरी बँक गटातून प्रथम पुरस्कार लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर बँकेस दिनांक ०५.१०.२०२३ रोजी डेल्टीन रिसॉर्ट, दमन ( दिव दमन) येथे भारतीय रिझर्व बँकेचे माजी मुख्य सरव्यवस्थापक (सीजीएम) मा. पी. के. अरोरा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी पुरस्कार स्विकारताना बँकेचे चेअरमन अशोकजी अग्रवाल, व्हा. चेअरमन सतीशजी भोसले, संचालक सूर्यप्रकाशजी धूत, धर्मवीरजी जाधव, लक्ष्मीकांतजी सोमाणी, अजितलालजी आळंदकर, शशिकांतजी मोरलावार, विजयजी वर्मा, गणेशजी हेड्डा, तज्ञ संचालक राजेशजी अग्रवाल, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारीअधिकारी अविनाश आळंदकर यावेळी उपस्थित होते, तसेच अविज पब्लिकेशन्स कोल्हापूरचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे व गॅलक्सी ईनमाचे संचालक अशोक नाईक यांची उपस्थिती होती.
सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट बँकांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने हा पुरस्कार दिला जातो. मागील ज्ञसलग ३ वर्षापासून लक्ष्मी अर्बन बँकेस हा पुरस्कार मिळत आहे. सदरील बाब हि कौतुकास्पद आहे. सदर पुरस्कारासाठी तज्ञ समितीने बँकेच्या कार्याचे मूल्यांकन करून निवड केली आहे.
लक्ष्मी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने बँकेचे अधुनिक डिजीटल बँकिंग मध्ये रुपांतर केले आहे. लक्ष्मी अर्बन बँक हि सहकारी बँकामधील लातूर जिल्ह्यातील संपूर्ण डिजीटल सेवा सुरू करणारी पहिली बँक आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शन सूचना व सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून लक्ष्मी अर्बन बँकेने अतिशय प्रेरणादायी वाटचाल केली आहे. आज बँकेकडे UPI, IMPS, Mobile Banking App, Rupay ATM Card, QR Code, NACH, BBPS अशा अधुनिक सुविधा कार्यान्वित आहेत.
या यशस्वी वाटचालीत सभासद, ग्राहकांची मोलाची साथ व बँकेच्या कर्मचारी वर्गाने संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली केलेले काम तसेच बँकेचे स्थानिक सल्लागार, पिग्मी प्रतिनिधी व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे बँकेस राष्ट्रीय स्तरावरचा बँको पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे मत, बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे व सर्वांचे अभिनंदन केले आहे.
إرسال تعليق