कोराळ येथे आरक्षणासाठी साखळी उपोषण आंदोलन

कोराळ येथे आरक्षणासाठी साखळी उपोषण आंदोलन
मुरुम (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील कोराळ येथील मराठा समाजाच्या मागणीसह मराठा आरक्षण योद्धा मनोज जंरागे यांना पाठिंबा देण्यासाठी कोराळ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने कोराळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व हनुमान मंदिरासमोर साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. कोराळ ग्रामपंचायत तर्फे ग्रामसभा घेऊन ठराव मांडण्यात आला. यात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण, राजकीय नेत्यांना गावबंदी, मतदानावर बहिष्कार, कॅन्डल मार्च आदी गोष्टींचा ठराव संमत करुन साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी निर्मला भगत, दिलीप सुरवसे, विक्रम दासमे, अमरजित भगत, गंगाराम पवार, शाहुराज जाधव, सतिश सुरवसे या समाज बांधवांनी उपोषण केले. यावेळी विलास भगत, रवि दासमे, विष्णू भगत, परमेश्वर जाधव, जीवन शिंदे, अजय सुरवसे, मनोहर सुरवसे, ओमप्रकाश शर्मा, दत्तात्रय दासमे, मंजुषा सगर, संगिता सुरवसे, अरुण भगत, अशोक दासमे, श्याम सुरवसे, बबन भगत, शरद जाधव, प्रविण सुरवसे, अशोक पाटील आदी बहुसंख्येने मराठा समाज उपस्थित होता.

Post a Comment

أحدث أقدم