औसा येथे पारंपारीक आग्गी सोहळा

औसा येथे पारंपारीक आग्गी सोहळा
औसा/प्रतिनिधी -औसा येथे श्री विरभद्रेश्वर मंदिरात सामूहिक आग्गी सोहळा दिनांक 31/10/2023 मंगळवार रोजी रात्री 7 वाजता संपन्न होत आहे. 
  येथे स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून परंपरे नुसार चाललेल्या सामूहिक आग्गी सोहळ्याची पाचव्या पीढिची परंपरा चालू आहे . याची सुरुवात ईरय्या स्वामी या पुरंत स्वामींनी केले. यांचा वारसा पुढे कायम ठेवण्याचे काम मृगय्या स्वामी , बसय्या स्वामी , सातलिंगय्या स्वामी व सद्या रामलिंगय्या स्वामी हे करीत आहेत . या आग्गी सोहळ्या च्या पालखीची मिरवणूक रामलिंग स्वामी यांच्या निवासस्थानापासून वीरभद्रेश्वर मंदिरापर्यंत वाजत गाजत जाते. नंतर कोळशाच्या विस्तवावरून चालण्याची परंपरा व वैज्ञानिक दृष्टिकोनातून आयोजित करण्यात येते तरी सर्व भक्त गणांनी पारंपारिक आग्गी सोहळ्याच्या कार्यक्रमास व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन पारंपारिक आग्गी सोहळ्याचे पुरंत रामलिंग सातलिंग स्वामी, अलोक रामलिंग स्वामी यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم