फडणवीसांना सोयाबीन दिंडीची आठवण करुन देण्यासाठी मातोळा ते किल्लारी पायी दिंडी काढणार-राजेंद्र मोरे

फडणवीसांना सोयाबीन दिंडीची आठवण करुन देण्यासाठी मातोळा ते किल्लारी पायी दिंडी काढणार-राजेंद्र मोरे

औसा :गेल्या दहा वर्षांपूर्वी  राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाशा पटेल यांच्या सोबतीने सोयाबीनला किमान 6000 रू भाव मिळावा म्हणून लातूर ते औरंगाबाद अशी पायी दिंडी मराठवाडाभर काढली होती. त्या दिंडीत  आपण केलेली मागणी आपल्याच आठवणीत कदाचित नसेल म्हणून मातोळा येथून खंडोबाचे दर्शन घेऊन किल्लारीतील निळोबापर्यंत पायी दिंडी काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांनी दिली आहे.
केंद्र आणि राज्यात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे सरकार सत्तेत आहे. सत्तेत येण्यापूर्वी आपण मोठ-मोठ्या घोषणा करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु,आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहू म्हणून घसा फाटेपर्यंत ओरडत होता हे शेतकरी विसरले नाहीत. त्यावेळी आपण सोयाबीनला 6000 रू प्रतीक्विटल भाव मागितला होता मग आता तुम्ही मागणाऱ्याच्या भूमिकेत नसून देणाऱ्याच्या भूमिकेत आहात मग अडचण कशात येतेय हा परखड सवाल ही  मोरे यांनी केला आहे. दिनांक 24 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पायी दिंडी काढून किल्लारी येथे  देवेंद्र फडणवीस यांना आठवण करुन देऊन आज वाढत्या यांत्रिकीकरणामुळे वाढलेल्या उत्पादन खर्च्याचा विचार करता सोयाबीनला प्रतीक्विंटल 9000 रू भाव मिळाला पाहिजे ही विनंती शेतकऱ्यांच्या वतीने करणार आहोत.
लातूर हे सोयाबीनचे आगर आहे. खरीपाचे प्रमुख पीक म्हणून इथला शेतकरी 80 टक्के शिवारात सोयाबीन हेच पीक घेतो त्यामुळे इथलं अर्थकारण सोयाबीनवरच अवलंबून आहे.
      प्रसिद्धी पत्रकात पुढे कुणाचे ही सरकार असो शेतकऱ्याचे मरण ठरलेले आहे असा घाणाघाती आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच सोयाबीनला 6000 रूपये भाव मिळण्याची मागणी केली होती त्याचा त्यांना विसर पडला आहे. सत्तेत येण्यासाठी आपण खोटं बोललात.अशी चर्चा लोकात असून तुम्ही दिलेले आश्वासन आम्ही तुम्हांला विसरू देणार नाही. अशी भूमिका सुद्धा पत्रकात राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी घेतली असून देवेंद्र फडणवीस यांच्या किल्लारी दौऱ्यावेळी असंख्य शेतकरी आमच्या पायी दिंडीत सहभागी होणार आहेत

Post a Comment

أحدث أقدم