शिवली-भादा-उटी रस्त्यासाठी आ.कराड यांच्या प्रयत्नातून १३ कोटी ५९ लक्ष रुपयाचा निधी मंजूर

 शिवली-भादा-उटी रस्त्यासाठी आ.कराड यांच्या 

प्रयत्नातून १३ कोटी ५९ लक्ष रुपयाचा निधी मंजूर

         लातूर - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भादा सर्कल मधील शिवली - भादा - शिंदेवाडी - उटी या साडेनऊ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ अंतर्गत भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून १३ कोटी ५९ लक्ष ७४ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

        भादा सर्कल मधील रामा ६८ ते शिवली - भादा - शिंदेवाडी - उटी दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने त्याचा वाहनधारकासह त्या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने सदरील रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून व्हावे याकरिता भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. गिरीशजी महाजन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

     आ. कराड यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सदरील ९.६ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ संशोधन व विकास अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी १२ कोटी ८२ लक्ष ९ हजार रुपये रुपये आणि सदरच्या रस्त्याची पाच वर्ष नियमित देखभाल व दुरुस्ती करिता ७७ लक्ष ६५ हजार रुपये असे एकूण १३ कोटी ५९ लक्ष ७४ हजार रुपयांचा निधी २९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णय परिपत्रकानुसार मंजूर झाला आहे.

रामा-६८ ते शिवली – भादाज – शिंदेवाडी - उटी रस्त्याच्या कामाला निधी मंजूर करून दिल्याबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे पद्माकर चिंचोलकरसोमनाथअप्‍पा पावलेबालाजी शिंदेसतिश कात्रेभालचंद्र पाटीलसुनिल सुरवसेयोगेश लटूरेगुणवंत करंडेराजकीरण साठेफुलचंद अंधारेमहादेव मुळेरविंद्र पाटीलराम पटणेअशोक वीरअक्षय भोसलेवाजीद पठाणबालाजी साळूंकेश्रीराम जावळेजावळेनागराज रिंगणकर यांच्‍यासह त्या त्या गावातील आणि परिसरातील भाजपाच्या कार्यकर्ते आणि नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم