कॅरीबॅग वापरणाऱ्यांवर मनपाची कारवाई ९७ किलो कॅरीबॅग जप्त ३३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल


कॅरीबॅग वापरणाऱ्यांवर मनपाची कारवाई ९७ किलो कॅरीबॅग जप्त ३३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल
    लातूर/प्रतिनिधी: शहरातील कॅरीबॅगचा वाढता वापर थांबविण्यासाठी मनपा आयुक्तांच्या आदेशावरून मंगळवारी (दि.२८)धडक मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत २७ आस्थापनांवर कारवाई करत ३३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
    या कारवाईत ९७ किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.कॅरीबॅग वापरास बंदी असतानाही अनेक ठिकाणी कॅरीबॅगचा सर्रास वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी त्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे,स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक सिद्धाजी मोरे, अक्रम शेख,सुरेश कांबळे, हिरालाल कांबळे,अमजद शेख,प्रदीप गायकवाड, गजानन सुपेकर,शिवराज शिंदे,प्रल्हाद शिंदे,धनराज गायकवाड,देवेंद्र कांबळे, श्रीकांत शिंदे यांनी मोहीम हाती घेतली.गंजगोलाई, रयतू बाजार,गांधी मार्केट, राजीव गांधी चौक या भागात विविध विक्रेत्यांवर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी अनेक ठिकाणी प्रतिबंधित कॅरीबॅग आढळून आल्या.कॅरीबॅग विक्री करणाऱ्या अथवा कॅरीबॅग मधून साहित्याची विक्री करणाऱ्या २७ स्थापनांवर यावेळी कारवाई करण्यात आली. यात ९७ किलो कॅरीबॅग जप्त करून ३३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गंजगोलाई भागातही कारवाई करण्यात आली.यात १५ हजार दंड वसूल केला गेला.१८ किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.या कारवाईत सिद्धाजी मोरे यांच्यासह महादेव फिस्के,सुनिल कांबळे,रवी शेंडगे,दत्ता पवार,निलेश शिंदे,महादेव धावारे,रहीम सय्यद आदींनी सहभाग घेतला.

   फळ व भाजीपाला तसेच इतर विक्रेत्यांनी कॅरीबॅगचा वापर करू नये. कॅरीबॅगचा वापर केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मनपाच्या वतीने देण्यात आला आहे. नागरिकांनीही कॅरीबॅग ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा,असे आवाहनही मनपाने केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم