शिवलिंगेश्वर फार्म डी.ची हिरणमयी धर्माधिकारीला राष्ट्रीय मिनी गोल्फ क्रिडा स्पर्धेमध्ये सुर्वण पदक

शिवलिंगेश्वर फार्म डी.ची हिरणमयी धर्माधिकारीला राष्ट्रीय मिनी गोल्फ क्रिडा स्पर्धेमध्ये सुर्वण पदक

 

औसा(प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या महिला संघाने 37 व्या राष्ट्रीय मिनी गोल्फ क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुर्वण पदक प्राप्त केले आहेमहाराष्ट्र राज्य मिनी गोल्फ असोशिएशन तर्फे महिला संघात तालुक्यातील आलमला येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील डॉक्टर ऑफ फार्मसी अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी कुहिरणमयी श्रीराम धर्माधिकारी ची निवड झाली होती.  या यशाबद्दल विद्यापीठ  जिल्ह्यातून अभिनंदन  कौतुक होत आहेसदरील स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर राज्य मध्यप्रदेशने द्वितीय क्रमांक आणि उत्तरांचल  चंदीगढ़़ यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे.

भारत सरकारच्या क्रिडा  युवक  कल्याण विभागनवी दिल्लीभारतीय ऑलिम्पिक संघ गोवा सरकार  गोवा ऑलिम्पिक असोशिएशन यांच्या संयुक्त विध्यमाने 37 व्या राष्ट्रीय मिनी गोल्फ क्रिडास्पर्धेचे आयोजन गोवा येथे दि. 25 ऑक्टोबर ते 09 नोव्हेंबर 2023 दरम्यान करण्यात आले होते.  

               सदरील विद्यार्थिनीच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवेउपाध्यक्ष प्रभाकर कापसेसचिव बसवराज धाराशिवेसहसचिव महादेव खिचडेप्राचार्य विश्वेश्वर धाराशिवेदगडोजीराव देशमुख डीफार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉकैलास कापसेविश्वेश्वरय्या पॉलिटेक्नीकचे प्राचार्य प्रशांत धाराशिवेब्ल्यू बर्ड इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या स्वाती कापसेविश्वेश्वरय्या औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गोपाळ दंडिमेसर्व संचालक मंडळविभाग प्रमुखशिक्षक  शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم