माधवराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण

माधवराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण  मुरूम (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, धाराशिव व राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्रच्या संयुक्त विद्यमाने रविवार (ता. २६) रोजी ७४ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी २६ /११ हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. सोनाली पवार, प्राजक्ता गोरे, निकिता पाताळे, प्रगती कुलकर्णी, अमोल कटके, सुभाष गायकवाड, प्रिती मुंडासे, प्रियंका मुंडासे, सुशिल मुके, अमित बनसोडे, मनोज हावळे, हर्षल गायकवाड, अनिकेत गायकवाड आदींनी सामुहिक संविधानाच्या उद्येशपत्रिकेचे वाचन केले. यावेळी महाअंनिसचे जिल्हा कार्यध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी संविधानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.  यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिलसिंग जाधव, प्रा. अजिंक्य राठोड, इसाली चाऊस आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे तर आभार प्रा. डॉ. शिला स्वामी यांनी मानले.          

Post a Comment

أحدث أقدم