देवणी मार्केट कमिटीला गतवैभव मिळवण्यासाठी नुतन संचालकांची धडपड

देवणी मार्केट कमिटीला गतवैभव मिळवण्यासाठी नुतन संचालकांची धडपड
देवणी/ प्रतिनिधी -परिणामी शेतीमालाची आवक वाढली
देवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डा मध्ये सध्या शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरूत झाल्याने बाजारात मालाच्या खरेदी विक्रीची रेलचेल जोरात सुरू झाली असून बाजाराला गत वैभव प्राप्तीचे वेध लागले आहेत. यासाठी सभापती सदाशिवराव रामचंद्रराव पाटील तळेगावकर व उपसभापती दिलीप मज़गे सह नूतन संचालक यांची धडपड सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नूतन सभापती सदाशिव पाटील तळेगावकर व उपसभापती दिलीप मजगे यांनी सांगितले की, आमचे नूतन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर मंडळांनी नियोजनबद्ध पद्धतीने येथील व्यापार वृद्धी वाढण्यासाठी व शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून व्यापाऱ्यासोबत बैठका घेऊन

नियोजनबद्ध पद्धतीने व्यापार व्यवसाय सुरू केल्याने येथील मार्केट कमिटीची बऱ्याच वर्षांपासून आलेली मरगळ आता दूर होताना दिसत आहे. व या मार्केटला गत वैभव प्राप्तीचे वेध लागल्याचे जाणवत आहे.

तालुक्यातील अर्थवाहिनी व

शेतकऱ्याचे नगदी पीक समजले जाणारे सोयाबीन या मुख्य शेतीमालाच्या खरेदी विक्रीत पूर्वीच्या पद्धतीत बदल करत चाळणी करून एक क्विंटरला एक किलो कडता ही पद्धत सुरू केली आहे. तर नियमाप्रमाणे माल विक्री झाल्यानंतर मालाची पट्टी रोख स्वरूपात अदा केली जात आहे. व येथील जुन्या चालीरीतीला पायबंद घालून व शेतकऱ्याचे हीत लक्षात ठेऊन दैनंदिनी यार्डातील सर्वच दुकानावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाची जाहीर बोली लावून खरेदी विक्री केली जात आहे. शिवाय या मार्केटमध्ये
आलेल्या आणि बाहेर गेलेल्या प्रत्येक शेतीमालाची मार्केट कमिटी तर्फ लेखी नोंद ठेवली जात आहे.
यामुळे सध्या येथील मार्केट यार्डात रोजच्यारोज यापूर्वी कधी असे घडले नाही इतकी सोयाबीन आवक वाढली आहे. सध्या या मार्केटमध्ये शेजारच्या कर्नाट राज्यातील सीमावर्ती भागातील शेतीमालाची आवक प्रमाणात सुरू झाली आहे. यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे संचालकाची धडपड कामी येत आसून लवकरच
होणार असल्याचे चित्र आलेल्या व मोठ्या वाढलेल्या मालाच्या आवक वरून दिसून येत आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, व संपूर्ण संचालक दिली.
देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीला मंडळ व सचिव, कर्मचारी हे जातीने व मार्केट यार्डाला गतवैभव प्राप्त लक्ष ठेऊन आहेत. याचाच परिणाम
देवणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्याना देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सदाशिवराव रामचंद्रराव पाटील तळेगावकर व उपसभापती दिलीप मजगे सह नुतन संचालक मंडळाणी देवणी मार्केट यार्डात आपला शेतीमाल आणून आपल्या फायद्या सोबतच देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नुतन संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.
म्हणून सध्या रोज दीड ते दोन हजार पोत्याची आवक येथील मार्केट कमिटीत असल्याची माहिती प्रभारी सचिव सुनील कळसे यांनी यावेळी दिली.

Post a Comment

أحدث أقدم