राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेचा शुभारंभ व विद्यार्थी संवाद
प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम व आ.बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थिती जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख यांचे आयोजन
औसा/प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचने प्रमाणे महाविद्यालय तेथे शाखा या उपक्रमाच्या शुभारंभासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मराठवाडा दौऱ्या प्रसंगी लातूर जिल्ह्या दौऱ्यावर आले अस्ता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख प्रदेश मुख्य सरचिटणीस विशाल विहीरे व विद्यार्थी संघटनेने जल्लोषात स्वागत केले.
या दौऱ्यात एज्युकेशन सोसायटी ला भेट दिली तेथील विद्यार्थ्याना शिक्षण कश्या प्रकारे दिले जाते.या बद्दल माहिती घेतली या नंतर शिरूर ताजबन येथे स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे विद्यार्थी शाखेचा शुभारंभ अहेमदपूर-चाकूर चे आ.बाबसाहेब पाटील यांनी केला व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रशांत दादा कदम यांचा सत्कार करण्यात आला.प्रदेशाध्यक्ष यांच्या सुचने नुसार कॉलेज तेथे शाखा या अभियाना अंतर्गत विद्यार्थी लातूर ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख यांनी तेथील विद्यार्थ्यांना संवाद साधत सांगितले की राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कॉलेज तेथे शाखा हे अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये एक बॉक्स ठेवले जाईल त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी आपल्या समस्या त्या बॉक्समध्ये चिठ्ठी घालून सांगू शकतो आणि तो बॉक्स आम्ही बघून विद्यार्थ्यांचे समस्यांचं निराकरण करण्याचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रयत्न करेल असे यावेळी त्यांनी सांगितले यानंतर चाकूर येथे उर्दू शाळेवर प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष व प्रदेश मुख्य सचिव सर्व पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चाकूर चे सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व मान्यवरांचे यावेळी सत्कार केले व यावेळी प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी उपस्थित राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अहमदपूर विनायक सूर्यवंशी,आदित्य लवटे,अविनाश भोरे बिलाल पठाण ,शकील गुढवे , रेहान शेख,वकील इनामदार, आदित्य लवटे,फरहान सिद्दिकी,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन:राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश मुख्य सरचिटणीस विशाल विहीरे ,जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख यांनी केले.
إرسال تعليق