सहकारी पतसंस्था ही गरजूंना मदत करणारी संजीवनीच-बसवराज पाटील

सहकारी पतसंस्था ही गरजूंना मदत करणारी संजीवनीच-बसवराज पाटील

मुरुम (प्रतिनिधी) : सहकारी पतसंस्था या जनतेच्या विकासासाठी काम करीत असतात. अशा सहकारी संस्था टिकविणे व वाढविणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्यच आहे. ही काळाची गरज ओळखून प्रत्येकाने पाऊल उचलणे गरजेचे आहे. लोक सहभागातूनच सहकार चळवळ उदयास आली. सहकारी पतसंस्था ही गरजूंना मदत करणारी संजीवनीच असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे बसवराज पाटील यांनी केले. आलूर, ता. उमरगा येथील श्री सोमेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून रविवारी (ता. १७) रोजी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राम जेऊरे होते. प्रारंभी बसवराज पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन इमारत व नामफलकाचे फीत कापून दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेचे संचालक श्रीकांत साखरे, बालाजी काळे, जितेंद्र पोतदार, शिवराज पाटील, शिरीष पाटील, शिवशरण वरनाळे, संगप्पा ब्याळीकुळे, रशीद शेख, वैशाली अघोर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, पतसंस्था ही सहकारी मूल्यांवर आधारित असते. या संस्था ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत करतात. सावकार व कंपन्यांकडून होणाऱ्या आर्थिक शोषणापासून संरक्षण देतात. म्हणून या संस्था समाजाच्या अविभाज्य अंग आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून या पतसंस्थेचे कामकाज भाडयाच्या इमारतीमध्ये चालू होते. मात्र आज ही संस्था  हक्काच्या इमारतीमध्ये चालू झाल्याचे समाधान सर्वांना असणारच असे ते शेवटी म्हणाले. यावेळी शरण पाटील, वैशाली अघोर, श्रीकांत साखरे आदींनी मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे चेअरमन सोमीनाथ कलशेट्टी, व्हाईस चेअरमन गाजीबक्ष सन्नाटे, सचिव विजयकुमार बिराजदर, संचालक दिलीप पोतदार, बसवराज लाटे, रामचंद्र काळू, संतोष भालके, हरी राठोड, वैराज कुलकर्णी, सुभाष कोतले, स्वाती धमगुंडे, शाहणम्मा पाटील, वैशाली कांबळे, व्यवस्थापक बसवराज म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार बिराजदार यांनी केले. उल्हास घुरघुरे यांनी सूत्रसंचलन तर आभार गाजीभक्ष सन्नाटे यांनी मानले. पतसंस्थेचे सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم