लातूर- येथील लक्ष्मी अर्बन को. ऑपरेटीव्ह बॅंक लि; लातूर, अग्रवाल समाज लातूर, लायन्स क्लब लातूर व उदयगिरी लायन्स आय रूग्णालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी अग्रेसन भवन लातूर येथे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या सुरुवातीस लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे हे होते तर प्रसिद्ध मेंदु विकार तज्ञ डॉ. देवाशिष रुईकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष व लक्ष्मी अर्बन बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी प्रस्ताविक करताना बँकेच्या सामाजिक व आर्थिक कार्याची माहीती दिली. प्रमुख पाहुणे डॉ.अजय देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक लातूर यांनी लक्ष्मी अर्बन बँकेच्या कार्याचे कौतुक केले. बँकिंग क्षेत्रात खूप जोखीम असुन बँकांनी सदैव सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच अग्रवाल समाज लातूर, लायन्स क्लब लातूर व उदयगिरी नेत्र रुग्णालयाच्या सहभागाबद्दल कौतुक केले. यावेळी लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. मन्मथ भातांब्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बँकेच्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लायन्सची ध्वजवंदना सुधाकर जोशी यांनी सादर केली. लक्ष्मी अर्बन बँकेचे अधिकारी सुशिल जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व उदघाटन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ३५० पेक्षा जास्त रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे व औषध वाटप करण्यात आले. जवळपास ८० रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झाली. त्यातील ४० रुग्णांची पहिली गाडी लगेचच उदगीर येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आली.
या प्रसंगी लक्ष्मी अर्बन बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल, व्हा. चेअरमन सतिश भोसले, बँकेचे संचालक लक्ष्मीकांत सोमाणी, अजितलाल आळंदकर, विजय वर्मा,गणेश हेडडा, आशिष अग्रवाल, विशाल हलवाई, संचालिका माला भुतडा, तज्ञ संचालक सीए किशोर भराडिया, सीए राजेश अग्रवाल, अग्रवाल समाज ट्रस्ट लातूरचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, कमलकिशोर अग्रवाल, लायन्सचे माजी प्रांतपाल डॉ.मन्मथ भातांब्रे, संचालक सुधाकर जोशी, माजी अध्यक्ष जयराम भुतडा,सुनिल सोमाणी, सचिव सुदर्शन कंजे, ला. भारत माळवदकर, लायन्स नेत्र रुग्णालयाचे डॉ. उमेश वर्मा , डॉ. गणेश जोगदंड, डॉ. विष्णु पवार, लातूर येथील नेत्र काऊंसलर धनश्री घोडके,कामगार कल्याण केंद्र संचालक ला. संगमेश्वर जिरगे, बँकेचे प्र. सीईओ अविनाश आळंदकर, प्रताप जाधव,अनिता कातपुरे, सुशील जोशी, संतोष बनभेरू, रविंद्र मदने, दिनेश कांबळे, सुहास राजमाने, सिद्धेश्वर पवार, अनुप सुवर्णकार, शिवकुमार राजमाने, किरण सुडे, परमेश्वर कडकंजे,अनंत दिक्षीत व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॅंकेचे अधिकारी सुशील जोशी यांनी केले व ला. सुधाकर जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.
إرسال تعليق