आलमला/प्रतिनिधी -जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा आलमला येथे दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते .या विज्ञान प्रदर्शनामध्ये केंद्रातील सर्व शाळा समाविष्ट झालेल्या होत्या त्यामध्ये प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागात विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रयोगाची उत्कृष्ट मांडणी केली होती या प्रयोगामध्ये रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला प्रथम व तृतीय क्रमांक मिळाला असून त्याची निवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झालेली आहे .या विज्ञान प्रदर्शनामध्ये माध्यमिक विभागातून प्रशांत कुंभार व सौरभ बोकडे या विद्यार्थ्यांनी हायड्रोपोनिक्स या प्रयोगाची उत्कृष्ट मांडणी करून त्याचे सादरीकरण मुलांनी केल्यामुळे त्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे .व द्वितीय क्रमांक ब्ल्यू बर्ड इंग्लिश स्कूल अलमला यांच्या हेमोडायलेसिस प्रयोगाला मिळाला असून तृतीय क्रमांक ही श्री रामनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हृदयाभिसरण संस्था हा प्रयोग कमलाकर जाधव ,आंबुलगे संगमेश्वर यांनी सादर केला. असून याही प्रयोगाची तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन साठी निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शिका म्हणून विज्ञान शिक्षिका उकरडे डी.आर श्री सूर्यवंशी बी वाय लॅब असिस्टंट धाराशिवे शंभू यांनी मार्गदर्शन केले आहे .या यशाबद्दल रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एड उमेश पाटील ,उपाध्यक्ष शिवाजी आंबुलगे ,सचिव प्रभाकर कापसे सहसचिव प्रा. नंदकिशोर धाराशिवे कोषाध्यक्ष चंनबसप्पा निलंगेकर संस्थेचे सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील जि.प.मुख्याध्यापक वामन राठोड केंद्रप्रमुख कदम सर पर्यवेक्षक पी.सी.पाटील व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. असून पुढील प्रयोगासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक विभागात रामनाथ विद्यालयास यश
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق