रेणापूर फाटा-दर्जी बोरगाव रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा ग्रा.पं.सदस्य अमोल माने यांचा उपोषणाचा इशारा

 रेणापूर फाटा-दर्जी बोरगाव रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा 


ग्रा.पं.सदस्य अमोल माने यांचा उपोषणाचा इशारा 

   रेणापूर/प्रतिनिधी: रेणापूर फाटा ते दर्जी बोरगाव जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून रखडले असून हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अन्यथा आमरण उपोषण करू,असा इशारा दर्जी बोरगावचे ग्रामपंचायत सदस्य अमोल अशोकराव  माने यांनी पालकमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.
   दर्जी बोरगांव हे तीर्थक्षेत्र असून तेथे दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. जानेवारी महिन्यात दर्जी बोरगाव येथे श्री चिन्मयानंद स्वामींचा संजीवन समाधी शताब्दी सोहळा होणार आहे. यानिमित्त ८ दिवस होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी भक्तांची मोठी गर्दी होणार आहे. परंतु रस्ता नादुरुस्त असल्याने भक्तांची गैरसोय होणार आहे.
   सुमारे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्यास मंजुरी मिळाली निविदा प्रक्रिया झाल्यानंतर कंत्राटदाराने कामही सुरू केले.त्यानंतर मात्र रस्त्याचे काम रखडले आहे.रस्ता नादुरुस्त असल्याने दर्जी बोरगावसह परिसरातील ग्रामस्थांना रेणापूर व इतर ठिकाणी जाण्यासाठी विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.प्रवासी, विद्यार्थी व रुग्णांना रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.यासाठी माने यांनी संबधितांना निवेदने दिली. अधिकाऱ्यांनी १५ डिसेंबर पर्यंत काम करण्याचे आश्वासन दिले आहे.
१५ डिसेंबर पूर्वी या रस्त्याचे काम झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू,असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

Post a Comment

أحدث أقدم