मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यातील निकालातून मोदीजींची प्रतिमा जगात उंचावली - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यातील

निकालातून मोदीजींची प्रतिमा जगात उंचावली
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर
देशाचे पंतप्रधान मा.ना.नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या कामाची योग्य अंमलबजावणी केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला शासनाच्या योजनेला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. हे चारपैकी तीन राज्यातील निकालातून समोर आलेले आहे. मोदीजींनी शेतकर्‍यांना दिलेले अनुदान, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 50 टक्के आरक्षण, प्रधानमंत्री मातृवंदना, बेटी बचाओ-बेटी पढाओ या योजनांच्या अंमलबजावणीमुळे सर्वसामान्य नागरिकांना व अल्पसंख्यांक समाजाला फायदा झाला. त्यामुळे त्यांचेही मतदान मोदीजींच्या पाठिशी राहिल्याचे जाणवते. त्याचा फायदा झाला. चार राज्यातील निवडणुकापैकी तीन राज्यामध्ये भाजपाला एकतर्फी विजय मिळवून देण्याचे काम जनतेने मतातून केलेले आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने मोदीजींच्या कार्यामुळे व तीन राज्यातील निकालातून भारताची प्रतिमा जगात उंचावलेली आहे. अशी प्रतिक्रीया भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली.
चार राज्यातील निवडणुकांपैकी तीन राज्यामध्ये भाजपाचे वर्चस्व निकालातून समोर आलेले आहे. मध्यप्रदेशमध्ये 230 जागापैकी 162 जागावर, राजस्थानमध्ये 199 पैकी 113 जागावर, छत्तीसगडमध्ये 90 पैकी 53 जागावर एकतर्फी विजय मिळविण्यामध्ये भाजपाला यश मिळालेले आहे. एकंदर तीन राज्यामध्ये एकहाती सत्ता भाजपाच्या हातात आली आहे. देशाचे पंतप्रधान मा.ना.नरेंद्रजी मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा व सहकारमंत्री अमितभाई शहा यांच्या कार्यामुळे भाजपाला एकतर्फी यश मिळालेले आहे. त्यामुळे भाजपाच्या या कार्यामुळे येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली भाजपा एकतर्फी यश संदपान करेल असा विश्‍वासही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.

Post a Comment

أحدث أقدم