जागतिक दिव्यांग दिनी आयोजित प्रभात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 जागतिक दिव्यांग दिनी आयोजित प्रभात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

·        लातूर शहरातील 15 विद्यालायांमधील विद्यार्थी सहभागी

लातूर: जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रविवार सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरीला सुरुवात झाली.

समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवारसहायक आयुक्त शिवकांत चिकुर्तेजिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडीउमंग संस्थेचे डॉ. प्रशांत उटगेजीवन विकास प्रतिष्ठानचे संचालक संजय निलेगावकरसंवेदना प्रकल्पाचे व्यंकट लामजनेजिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बस्वराज पैके यांच्यासह दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापकशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

क्रीडा संकुल येथून निघालेली या प्रभात फेरीत दिव्यांग विद्यार्थ्यांनी घोषवाक्येफलक यांच्या माध्यमातून जनजागृती केली. छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आल्यानंतर प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला. शहरातील 15 विद्यालयांतील विद्यार्थी या प्रभात फेरीत सहभागी झाले होते. प्रभातफेरी यशस्वी करण्यासाठी जिल्हाज समाज कल्याण कार्यालयातील रामचंद्र  वंगाटेराजु गायकवाडबाळासाहेब वाकडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यावर भर राहील : अनमोल सागर

दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. तसेच त्यांच्या अडीअडचणी समजून घेवून त्या सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर म्हणाले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नवनवीन उपक्रम राबवून त्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलअसे त्यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांग बांधवांच्या कळण्यासाठी लातूरचा वेगळा लातूर पॅटर्न तयार होत असल्याचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त श्री. देवसटवार यांनी सांगितले.

प्रभात फेरीतील फलकांनी लक्ष वेधले

या प्रभातफेरीत मुकबधिरगतिमंदअंधअस्थिव्यंयग व बहुविकलांग विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी फलकाच्या माध्यमातून विविध संदेश देत जनजागृती केली. श्रवणयंत्र लावू या सगळे मिळून बोलू यानिदानाची हयगय जीवनाची गैरसोयएकच आवड श्रवणयंत्रची निवडमतिमंदांना नको केवळ सहानुभूती करावी त्यादसाठी सहयोगाची कृतीअसे संदेश प्रभात फेरीतील फलकांवर लिहिण्यात आले होते.

उमंग सेंटरमध्येा विशेष मुलांची आरोग्यग तपासणी

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रविवारी सकाळी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयामागील उमंग  रिसर्च सेंटर येथे दिव्यांग विशेष मुलांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरजिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांससह पालकांची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم