नगरपंचायतीच्या तीन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

नगरपंचायतीच्या तीन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चार उमेदवार शिवसेनेकडून निवडून आले होते. त्यापैकी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अनंत काळे,नगरसेवक कुसुमताई माधव खरटमोल व नगरसेवक जयश्रीताई दिलीप आवाळे यांनी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थित 1 डिसेंबर रोजी लातूर येथे भाजपात प्रवेश केला.
भाजपाचे तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, शहराध्यक्ष तथा नगर पंचायतीचे गटनेते संतोष शेटे,नगराध्यक्ष प्रतिनिधी गणेश धुमाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, गणेश धुमाळे, शहराध्यक्ष संतोष शेटे,  युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ॲड.गणेश सलगरे,भाजपाचे संजय आवले, माधव खरटमोल व रोहित आवाळे उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم