हिवाळी अधिवेशनावर शिक्षक समितीचा भव्य आक्रोश मोर्चात सामील व्हा -जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके

 हिवाळी अधिवेशनावर शिक्षक समितीचा भव्य आक्रोश मोर्चात सामील व्हा -जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके
 निलंगा- येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक पार पडली... 
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके हे उपस्थित होते.प्रमुख मार्गदर्शक राज्य संपर्कप्रमुख किशनरावजी बिरादार , जिल्हा सरटचिटणीस चंद्रकांत भोजने, मराठवाडा उपाध्यक्ष विकास पुरी, जिल्हा नेते  संजय सूर्यवंशी, जिल्हा नेते  नजीर मुजावर ,बालाजी येळीकर तसेच सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष व तालुका कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांवर अनेक प्रकारची अशैक्षणिक कामे लादली जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षकांना फक्त शिकवण्याचीच काम करू द्या सोबतच बंद केलेली जुनी पेन्शन चालू करा या प्रमुख मागणी सह अनेक मागणीसाठी 11 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा वतीने शिक्षकाचा महा मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके यांनी दिली.
   शिक्षकाकडून ऑनलाईन माहिती व अन्य अशैक्षणीक कामे करावी लागतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित होत आहे शिक्षकांना शिकू द्या विद्यार्थ्याला शिकू द्या राज्यात जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा कमी पटसंखेच्या शाळा बंद करू नका गावात निवासस्थान उपलब्ध करून देईपर्यंत मुख्यालय निवासाची सक्ती करू नये घरभाडे भत्ता बंद करू नये दत्तक शाळा योजना रद्द करावी वेतन आयोगाची थकबाकी तात्काळ आदा करावी नगरपरिषद व मनपा शिक्षकांचा सहावा व सातवा वेतन आयोगाच्या थकबाकी तत्काळ अदा करावी वैद्यकीय बिलासाठी बजेट तरतूद करावी या प्रमुख मागण्या सोबतच शिक्षक व विद्यार्थी हिताच्या न्याय मागण्यासाठी 11 डिसेंबरला सकाळी अकरा वाजता शिक्षकाचा महामोर्चा राज्य नेते उदय शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरेगावकर यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे.
आक्रोश मोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित रहीवे असे आवाहन राज्यशाखेकडुन करण्यात येत आहे.सदरील बैठकिला जिल्हातील सर्व तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.त्या प्रसंगी निलंगा तालुक्याचे तालुकाध्यक्ष संजय कदम सर, केदारनाथ बिडवे लातूर, अभय बिरादार उदगीर,राम शेवाळे चाकुर, प्रकाश मोरतळे जळकोट,शिवाजी टेळे देवणी,कमलाकर काकडे औसा, तुकाराम पाटील शिरुर अनंतपाळ,निलंगा कार्याध्यक्ष विष्णूकांत धुमाळ, सरचिटणीस गणेश गायकवाड, भरत वाघमारे, श्री भीमराव सुर्यवंशी, डी व्ही सुर्यवंशी, बि एम पाटील सर, निलंगा कोष्याद्यक्ष गोरख म्हेत्रे सर,  सी के पाटील सर,वसंत पाटील,सुरेश जाधव  उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم