केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.च्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा

  केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.च्या वतीने   नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा 
लातूर : लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने रविवार, दि. १० डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम डॉ. भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. 
या गौरव सोहळ्यास महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे,महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.चे सचिव अनिल नावंदर,असो.चे प्रदेश उपाध्यक्ष अरुण बरकसे, संघटन सचिव मदन पाटीलांडी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा गौरव झाल्यानंतर उपस्थितांना  मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.   लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची नुकतीच संपन्न झाली. त्यात सर्वच्या सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आले. या सर्व पदाधिकाऱ्यांचा लातूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. या गौरव सोहळ्यास केमिस्ट बांधवांनी  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे  असे आवाहन अध्यक्ष ईश्वर बाहेती, सचिव नागेश स्वामी, उपाध्यक्ष अरविंद औरादे, रविंद्र  दरक, मनोज आगाशे, कोषाध्यक्ष राजकुमार राजारूपे  यांसह  लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم