नुतन सरपंचांचे लातूरात प्रशिक्षण संपन्न

 नुतन सरपंचांचे लातूरात प्रशिक्षण संपन्न
लातूर-येथील कृषी विज्ञान केंद्रात बीड जिल्ह्यातील नुतन सरपंचाचे यशवंतराव चव्हाण अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात "यशदा"तर्फे प्रशिक्षण घेण्यात आले.
दिनांक सहा जानेवारीपासून हे प्रशिक्षण दिनांक नऊ जानेवारी २०२४या काळात घेतले गेले.
प्रशिक्षण प्रमुख सौ नीता मगर मुळावकर यांच्यासह माधव गंभीरे,पंकज शेळके, कमलाकर सावंत,झेड ए सय्यद ,उध्दव फंड आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
त्यात नऊ थीम, ग्रामपंचायत अधिनियम, ग्रामपंचायत रेकॉर्ड १ते३३रजिष्टर, सरपंच यांची ग्रामविकासात भुमिका व स्थानिक भेट आदी विविध प्रकारच्या विषयांवर मार्गदर्शन केले गेले.
कृषी विज्ञान केंद्र लातूर तर्फे सतिश बेंद्रे व योगशिक्षक कृष्णा मुळावकर यांनी त्यासाठी आयोजन सहाय्य केले.

Post a Comment

أحدث أقدم