स्वराज्य जननी जिजाऊ आणि विवेकानंदांचा वसा व वारसा युवकांनी जपवा. - डॉ. संदीपान जगदाळे

स्वराज्य जननी जिजाऊ आणि विवेकानंदांचा वसा व वारसा युवकांनी जपवा. - डॉ. संदीपान जगदाळे
लातूर - "माँसाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याचे देखणे स्वप्न आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि ते सत्यात उतरविण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा घडविला. तर स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती चे श्रेष्ठत्व जगासमोर मांडले. त्यांच्या कार्याचा वसा व वारसा युवकांनी जपावा."असे प्रतिपादन रा. से. यो. विभागीय समन्वयक डॉ. संदीपान जगदाळे यांनी व्यक्त केले. ते दयानंद कला महाविद्यालयात आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
    पुढे ते म्हणाले की ,"स्वामी विवेकानंदांनी ११ सप्टेंबर १८९३  रोजी अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक सर्वधर्मपरिषदेत मध्ये ७००० लोकांपुढे  "बंधू आणि भगिनी" म्हणून विश्वबंधुत्वाचा पसायदान सांगितले. सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन करून त्यांनी अमेरिकेतील नागरिकांची मने जिंकली. 
        स्वामी विवेकानंदांची राष्ट्रभक्ती, ब्रह्मचार्य, चारित्र्य निर्मिती, बलोपासना,योगसाधना, कलासक्त इत्यादी गुणांचा अंगीकार तरुणांनी केल्यास निश्चितच आपले राष्ट्र पुनर्वैभवापर्यंत पोहोचेल." असेही ते म्हणाले. 
        याप्रसंगी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर हे उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करताना ते म्हणाले की,"युवतींनी जिजामाता यांचे कार्याचा आदर्श घ्यावा तर युवकांनी स्वामी विवेकानंदांचे चरित्र वाचून युवा दिन साजरा केला तरच या महान विभूतींना अभिवादन ठरेल" 
        या कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक संजय तिवारी, डॉ. सुनील साळुंके, डॉ.रमेश पारवे, डॉ. प्रदीप सुर्यवंशी, डॉ. अंजली जोशी, डॉ. रामेश्वर खंदारे, डॉ. बालाजी घुटे, डॉ. संतोष पाटील, डॉ. सुभाष कदम, रामकिसन शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم