जगभरातील विद्यापीठ बाबासाहेब इथे शिकले म्हणून गौरव मानतात-प्रा. किरण सगर

जगभरातील विद्यापीठ बाबासाहेब इथे शिकले म्हणून गौरव मानतात-प्रा. किरण सगर

मुरुम (प्रतिनिधी) : जगभरातील विद्यापीठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्या विद्यापीठात शिकले म्हणून धन्यता मानतात. परंतु मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर काळात अनेक प्रस्थापित मंडळी विरोध करीत होती,
असे प्रतिपादन नामविस्तार दिनानिमित्त रविवारी (ता. १४) रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना प्रा. किरण सगर यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराळी विहारचे सुमंगल भंत्ते हे होते.  यावेळी डी. टी. कांबळे, मत्सेंद्र सरपे, एस. के. कांबळे. प्रा. नागसेन कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संतोष सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. सगर म्हणाले की, विविध सामाजिक,राजकीय, आर्थिक, शेतीविषयक, पत्रकारिता आदी विषयांवर गंभीरपणे संशोधन करणारे आणि भारतीय संविधान शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक विचार लक्षात घेऊन त्यांचे नाव मराठवाडा विद्यापीठास द्यावे, अशी आंबेडकर प्रेमी जनतेची भूमिका होती, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात बौद्धाचार्य मिलिंद डोईबळे यांनी नामांतर चळवळीचा इतिहास सांगितला आणि शहिदांच्या शौर्याचे स्मरण केले. अध्यक्षीय समारोपात सत्रात  कराळी विहाराचे सुमंगल भंत्ते यांनी नामांतर काळातील स्थिती, परिस्थितीची  आठवण करून दिली. कमलाकर सुर्यवंशी यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी जीवन सुर्यवंशी, उध्दव गायकवाड आदी समता सैनिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात दाळींब येथील गायन पार्टीने भीम गीत गायन केले. दिवसभर नामविस्तार दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत होते.

Post a Comment

أحدث أقدم