राष्ट्रमाता जिजाऊ, विवेकानंद जयंती दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

राष्ट्रमाता जिजाऊ, विवेकानंद जयंती दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन
लातूर -श्री हरिहर प्रतिष्ठान संचलित, गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रमाता जिजाऊ, युगप्रर्वतक स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव धनराज जोशी सर तर प्रमुख पाहुणे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय शैक्षणीक महासंघ तथा व्यवस्थापन परिषद सदस्य स्वा.रा.ती.म. वि. नांदेडचे मा. श्री. संतराम मुंडे हे होते. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती प्रस्तुत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण, डॉ. मंगेश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सचिन प्रयाग हे होते. प्रमुख पाहुणे मा. श्री. संतराम मुंडे यांनी संस्थ्येच्या कार्याचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या प्रेरनेणे त्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी 19 ससदस्यांनी रक्तदान केले.याप्रसंगी सातत्याने रक्तदान करणाऱ्या डाॅ.प्रा नयन भादुले, प्रा.निलेश क्षिरसागर,प्रा.कल्पना झांबरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
    अध्यक्षीय समारोप संस्था सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. धनराज जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी  डॉ. सचिन प्रयाग यांनी केले तर, 
याप्रसंगी  रा.से. यो. सह कार्यक्रम अधिकारी, सहा.प्रा. निलेश क्षिरसागर, डॉ. नयन भादूले व भालचंद्र ब्लड बँकेतील श्री. किशोर कांबळे, श्री. महेंद्रकुमार गांधले, श्री. संतोष पाटील, सौ. गायत्री इगवे, श्री. संजय साळुंके, श्री. अन्सार शेख,  महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. आरेफ शेख, सहा.प्रा. प्रीती पाचंगे, सहा.प्रा. नेहा कांबळे, सहा.प्रा. माधुरी जोशी,  व विद्यार्थी बहुसंख्येने  उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. विद्यादेवी कांबळे यांनी केले व आभार सहा.प्रा. अनिता चौधरी यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم