आलमला-आलमला ता. औसा जि.लातूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांत सनानिमित्त ग्रामदैवत विठ्ठल रुक्मिणी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला या यात्रा महोत्सवात जंगी कुस्त्याचा फडही रंगला होता या कुस्त्या स्पर्धेत मराठवाड्यातील नामांकित मल्लांनी हजेरी लावली .सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून दोन लक्ष रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये रामनाथ शिक्षण संस्था, विश्वेश्वर शिक्षण संस्था व ग्रामपंचायत कार्यालय आलमला ,जि प प्रशाला केंद्रीय शाळा अलमलाच्या वतीने मल्लांना आकर्षित करण्यासाठी ढाल व चषक देण्यात आले .यामध्ये अलमला केसरी केसरीचा विजेता ठरला रामलिंग मुदगड येथील मल्ल प्रदीप गोरे याला ग्रामपंचायतीच्या वतीने ढाल आणि सात हजार रुपयांचा इनाम देण्यात आला रामनाथ शिक्षण संस्था, विश्वेश्वर शिक्षण संस्था, जि प केंद्रीय प्राथमिक शाळा अलमलाच्या वतीनेही रोख रक्कम आणि चषक देऊन ती कुस्ती जिंकणाऱ विजय मल्लांचा सन्मान करण्यात आला, लाल मातीची कुस्ती आजही ग्रामीण भागामध्ये मल्लांना आकर्षित करत आहे. त्याचा अनुभव काल अलमला येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये दिसून आला अनेक मल्लांनी आपलं कसब दाखवून आकर्षक कुस्त्या करून चित्रपट चा खेळ दाखवून लोकांची मने आकर्षित केली या कुस्ती स्पर्धेसाठी संयोजक समितीमध्ये गावातील प्रतिष्ठित मंडळी चेअरमन विश्वनाथ बिराजदार ,सरपंच विकास वाघमारे, उपसरपंच इरफान मुलांनी पो. सुरेंद्र पाटील , ऍड उमेश पाटील, नरेंद्र पाटील, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, प्रभाकर कापसे महादेव कुंभार ,गंगाधर वाघमारे, वीरनाथ अंबुलगे , रामेश्वर पाटील ,गुरुनाथ अंबुलगे,धीरज लांडगे किशोर पाटील,शिवरुद्र बेरुळे, सोमनाथ आंबुलगे, ऍड संदीप पाटील ,अशोक लोहारे ,महादेव जगदाळे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थांनी हिरीहिरीने भाग घेतला या कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभलेले रामनाथ विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रंगनाथ अंबुलगे, प्रा. रोहिदास माने, नितीन जडगे ,काशिनाथ पाटील गणेश समशेट्टे ,रवी कदम,संगमेश्वर हुरदळे, प्रशांत हुरदळे इत्यादीनी,पंचांनी भूमिका उत्कृष्ट पार पाडली आणि ग्रामीण भागातील एक उत्कृष्ट कुस्ती आखाडा म्हणून आलमले यांचे नाव अजरमर करण्यामध्ये ग्रामस्थ यशस्वी ठरले या संयोजन समितीमध्ये अनेक ग्रामस्थांनी आर्थिक मदत देऊन मल्लांना प्रोत्साहित केले .त्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने सर्व मल्लांचे आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.
पै.प्रदीप गोरे आलमला केसरी विजेता ठरला
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق