सर्वेक्षणादरम्यान कुटुंब प्रमुखांनी माहिती द्यावी- तहसीलदार भरत सुर्यवंशी

सर्वेक्षणादरम्यान कुटुंब प्रमुखांनी माहिती द्यावी- तहसीलदार भरत सुर्यवंशी

औसा प्रतिनिधी-तालुक्यातील सर्व गावामध्ये ग्रामीण व शहरी भागात राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करून (इंम्पेरिकल डेटा) माहिती संकलित करण्याबाबत मा. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांना निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मा. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांचेकडून प्राप्त सुचनानुसार लातूर जिल्हयातील औसा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील मराठा समाज खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी व माहिती गोळाा करण्यासाठी शहरी भागातील प्रत्येक प्रभाग निहाय व प्रत्येक गावनिहाय प्रगणक व पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणाचे काम दि. 23.01.2024 ते दि. 31.01.2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या कालावधीत या कामासाठी नियुक्त प्रगणक गावातील व शहरातील प्रत्येक कुंटुंबास भेट देऊन मा. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून देण्यात आलेल्या प्रश्नावलीनुसार मोबाईल ॲपव्दारे माहिती संकलित करणार आहेत.
तरी या सर्वेक्षणादरम्यान कुटुंब प्रमुखांनी घरी थांबुन आपली माहिती प्रगणकांना देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन नोडल अधिकारी तथा तहसीलदार औसा भरत सुर्यवंशी यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم