लातूर/प्रतिनिधी-भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची स्वायत्त संस्था नेहरू युवा केंद्र संघटनेच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली एक समिती आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती येणाऱ्या काळात लातूर जिल्हातील
युवकांच्या विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन,सल्ला देण्याचा काम ही समिती करेल.माननीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, श्री अनुराग सिंह ठाकूर यांच्याकडून सुशांत एकोर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुशांत धनराज एकोर्गे हे मागच्या काही वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.यापूर्वी लातूर महानगरमंत्री,देवगिरी प्रदेश कार्यसमिती सदस्य अश्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत.लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, उपक्रम व तसेच विद्यार्थ्याच्या प्रश्नासाठी आंदोलनाचे नेतृत्व देखील त्यांनी केले आहे.यांच्या याच कार्याची दखल घेत.नेहरू युवा केंद्र संघटनेच्या युवा कार्यक्रमावरील जिल्हा सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक केलं जातं आहे.
إرسال تعليق