हासेगाव पॉलिटेक्निकच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ.अभिमन्यू पवार

हासेगाव पॉलिटेक्निकच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ.अभिमन्यू पवार 
     औसा/ प्रतिनिधी-तालुक्यातील हासेगाव ता.औसा जि लातुर येथील श्री.वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित राजीव गांधी इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक चा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी २०२३ या परीक्षेचा निकाल घोषित झालेला असून  राज्य शासनाच्या नियमावली नुसार पारंपरिक पद्धतीने दिलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. 
               
             परीक्षेत जे विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अभिनंदनासह सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 

      राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक हासेगाव महाविद्यालयातुन अथर्व देशपांडे प्रथम , व्दितीय क्रमांक शेख जिशान  तर  तृतीय क्रमांक काळे श्रुतीने पटकावला आहे.

  याचबरोबर (कॉम्प्युटर) संगणक अभियांत्रिकी शाखा प्रथम वर्षातून काळे श्रुती ८०.१२% घेऊन प्रथम , आरबाळे मानसी ७८% व्दितीय , धवन अक्षता ७७%  तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

(इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) माहिती  तंत्रज्ञान अभियांत्रिकी  शाखा प्रथम वर्षातून अथर्व देशपांडे ८२.४७% प्रथम, शेख जिशान ८१.०६%व्दितीय,जवळगे वृष्टी ७७.२९% तृतीय क्रमांक पटकावला आहे.

  (इलेक्ट्रिकल) विद्युत अभियांत्रिकी शाखा व्दितीय वर्षातून भोसले गणेश ७२% प्रथम, भांगे पौर्णिमा ६९% व्दितीय,नागुरे नागेश ६७% घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे, तर  तृतीय वर्षातुन कांबळे सुग्रीव ७५% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

( सिविल ) स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून निकम बळीराम ७०% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे.
     या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आमदार अभिमन्यू पवार समवेत संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे ,प्राचार्य संतोष मेतगे, प्राचार्या योगिता बावगे, संचालक नंदकिशोर बावगे , संचालक आत्माराम मुलगे,  प्रा.एस.एन.गायकवाड ,प्रा.डी.पी.पाटील,प्रा.एस.एम.पंचाक्षरी, प्रा.ताडके के. डी.,प्रा.कल्याणकर एस ए,प्रा.पठाण एस ए ,प्रा कोरे आर एस,प्रा सांगवे आर एस,प्रा शेख टी एस, पाटील ए आर,ग्रंथपाल सवाई मनदिप,माने एस.एस.आदींनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم