शालेय विद्यार्थ्यांना पोलीसांकडून प्रशासन व शस्त्रांची माहिती

शालेय विद्यार्थ्यांना पोलीसांकडून प्रशासन व शस्त्रांची माहिती
मुरूम ( प्रतिनिधी) : येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने सोमवारी ( ता. ८) रोजी रायजिंग डे निमित्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र  शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाचे कामकाज, विविध शस्त्राच्या माहिती बाबत धडे घेण्यात आले. ८ जानेवारी रोजी पोलीस ठाणे मुरूम येथे पोलीस वर्धापन दिन सप्ताह २ ते ८ जानेवारी अंतर्गत मुरूम शहरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून पोलीस वर्धापन दिनानिमित्त माहिती देण्यात आली. पोलीस कामकाज त्यामध्ये तक्रार, मुद्देमाल कक्ष, लॉकअप, शस्त्र इत्यादी माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना बाललैंगिक प्रतिबंधक अधिनियम, महिला अत्याचार अधिनियम, पोक्सो अधिनियम, सायबर क्राईम, हनी ट्रॅप व सोशल मीडिया जनजागृती बाबत माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवनकुमार इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत शिंदे, ठाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

أحدث أقدم