मुरुम(प्रतिनिधी) : माणसं एखाद्याची तेंव्हाच दखल घेतात जेंव्हा एखाद्याचं मन उदार असतं; ज्यांच्याकडे दातृत्वाचा गुण असतो, ज्ञानाचे दान असो की, आपल्या पदरी असलेला पैसा एखाद्याच्या अति गरजेच्या वेळी उपयोगात येणे असो अथवा विविध क्षेत्रात केलेली मोलाची कामगिरी असो. अशा प्रकारची व्यक्ती प्रा. किरण सगर असल्याने साहित्यिकांना व विवेकी लोकांना त्यांचा सन्मान करावा वाटतो. समाजोपयोगी माणसांची दखल समाज घेतोच असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. म. शहाजिंदे यांनी व्यक्त केले.
उमरगा शहरातील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातून प्रा. किरण सगर हे नुकतेच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने त्यांचा कार्य सन्मान-सत्कार सोहळा साहित्य प्रेमी उमरगा-लोहारा व इंद्रधनू वृध्द सेवा केंद्र, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण शिक्षण संस्था, गुंजोटीचे सचिव डॉ. दामोदर पतंगे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. म. शहाजिंदे उपस्थित होते. यावेळी मारोती खोब्रे गुरुजी, मनोहर पुर्णे गुरुजी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. डॉ. राजकुमार कानडे, धाराशिव जनता बँकेचे संचालक प्रदीप पाटील, प्रा. रत्नाकर पतंगे, श्रीमती सविता सगर, गोविंदराव चात्रे, भगीरथ गायकवाड, अनिल सगर, कवयित्री ॲड. शुभदा पोतदार, विजय वडदरे, प्रा. डॉ. अवंती सगर, सुभाष वैरागकर, रघुवीर आरणे, चंद्रशेखर कंदले आदींची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात डॉ. पतंगे यांनी प्रा. किरण सगर यांनी शिक्षणासोबतच सामाजिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाचे कार्य केल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस. वाय. जाधव यांनी केले. सुत्रसंचलन गुंडू दुधभाते यांनी केले. तसेच अस्मिता विश्वस्त मंडळ, इंद्रधनू वृध्द सेवा केंद्र यांच्या वतीने सन्मान पत्र प्रदान करण्यात आले. सन्मान पत्राचे वाचन प्रा. मारूती खमितकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
साहित्य प्रेमी कवी हिराचंद देशमाने, मधुकर गुरव, कवी सुधाकर झिंगाडे, काशिनाथ बिराजदार, विश्वनाथ महाजन, अमर देशटवार, प्रा.शिवराम अडसूळ, किरण बेळंमकर यांनी परिश्रम घेतले. सर्व उपस्थितांचे आभार अस्मिता मंडळाचे सचिव प्रा. अभयकुमार हिरास यांनी मानले.
إرسال تعليق