औसा: औसा तालुक्यातील जवळगा पोमादेवी येथे गुरु रविदास जयंतीनिमित्त चर्मकार बांधवांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुधीरजी बनसोडे हे उपस्थित होते तर प्रमुखा तिथी म्हणून गावचे उपसरपंच निलेश काकडे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सी के मुरळीकर जिल्हाध्यक्ष रवि कुरील जिल्हा कार्याध्यक्ष अनिल कबाडे जिल्हा उपाध्यक्ष धनराज काजळे तालुकाध्यक्ष इंजी. रवी भावले महाराष्ट्र आर्यन सेनेचे संस्थापक अध्यक्ष अविराजे निंबाळकर रेनापुर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश सोनवणे हे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुरु रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नामफलकाचे अनावरण राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सि के मुरळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या यानंतर जवळगा पोमादेवी शाखेतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा फेटा बांधून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी गुरु रविदास मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गावातील माजी सैनिक काशिनाथ कांबळे यांनी 11000 रुपयाची देणगी जाहीर केली. यावेळी सी के मुरळीकर साहेब यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सामाजिक उपक्रम राबवण्याचे आदेशित केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औसा तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्याध्यक्ष अनिल कांबळे खंडू (दादा )कांबळे, अर्जुन (भाऊ) कांबळे, ज्ञानदेव कांबळे, विठ्ठल कांबळे ,अशोक कांबळे, कालिदास कांबळे, परमेश्वर कांबळे ,बालाजी कांबळे, किसन कांबळे ,दशरथ कांबळे ,गोविंद कांबळे, व्यंकट दत्तू कांबळे, कांबळे, देविदास कांबळे, अनिल कांबळे, सतीश कांबळे, प्रशांत कांबळे ,श्रीजीत कांबळे, सहदेव कांबळे, राम कांबळे, लक्ष्मण कांबळे, भगवान कांबळे, विगल कांबळे, अमोल कांबळे, खंडू कांबळे ,युवराज कांबळे, किशोर कांबळे ,अमोल कांबळे ,आदींनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق