महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीच्या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 11000 पटकाविले

महाराष्ट्र  कॉलेज ऑफ फार्मसीच्या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 11000 पटकाविले
निलंगा/प्रतिनिधी-श्रेयश प्रतिष्ठानचे श्रेयश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च्च सेंटर छत्रपती संभाजी नगर यांच्यातर्फे दिनांक २२-२४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथम राज्यस्तरीय फार्मा व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन दिवसीय  स्पर्धत महाराष्ट्र  कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथील संघाने भाग घेऊन द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 11000 पटकाविले असून संघातील खेळाडू शेख दाऊद, रापेलीवार गजानन, सोनवणे साहिल, शिंदे माधव, कदम ज्ञानेश्वर, मस्के धीरज, सुरवसे अभिषेक, चाळकापुरे हरीओम, संघ व्यवस्थापक डॉ. सी.व्ही.पांचाळ यांचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर, प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, प्राचार्य डॉ. बी. एन. पौळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم