विद्यापीठ स्तरीय पोवाडा गायन स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालय प्रथम

विद्यापीठ स्तरीय पोवाडा गायन स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालय प्रथम

लातूर/प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांच्या वतीने विद्यापीठस्तरीय समूह पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात दयानंद कला महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला व यशाची परंपरा कायम ठेवली. दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. 
       शिवजन्मापासून ते हिंदवी स्वराज्य स्थापनेपर्यंत व राज्याभिषेक सोहळ्याचे दर्शन घडवणारा पोवाडा विद्यार्थ्यांनी दहा मिनिटात सादर केला. पोवाड्याचे लेखन व संगीत संयोजन डॉ. संदीपान जगदाळे यांनी केले. यात अधिराज जगदाळे, ज्ञानेश्वर जाधवर, अनमोल कांबळे, सुहास कोलवाड, श्रद्धा नरसिंगे, प्रतीक्षा भुतकर यांनी सादरीकरण केले. त्यांना हरी कुंभार, अनंत खलुले, सूरज साबळे, स्वरांजली पांचाळ यांनी समर्पक साथसंगत केली.
       यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान महाविद्यालयात नवीन एम.ए. इतिहास, समाजशास्त्र,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि प्रशासकीय सेवा अभ्यासपाठ्यक्रम वर्ष २०२४-२५  पासून सुरु करण्यास्तव विद्यापीठ प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता समिती अध्यक्ष म्हणून डॉ. दिलीप अंबाजी पाईकराव, नागनाथ  कॉलेज, औंढा नागनाथ, जि. हिंगोली, डॉ. राम मुटकुळे सदस्य, बर्हिजी स्मारक महाविद्यालय, वसमत,डॉ. ज्ञानेश्वर जी. गाडे श्री योगानंद स्वामी महाविद्यालय यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
       पारितोषिक स्वरूपात मिळालेला रु. दहा हजार रुपयांचा धनादेश अधिराज जगदाळे व सर्व विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला. हा निधी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उपयोगात आणला जाणार आहे.
       यशस्वी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अंजली जोशी, संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. शरद पाडे, प्रा. सोमनाथ पवार, प्रा. विजय मस्के यांचे मार्गदर्शन लाभले. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य अनिलकुमार माळी,पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, कार्यालय अधीक्षक संजय तिवारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم