लातूर/ प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने राज्यातील बाजार समितीचे सभापती व सचिवांची एक बैठक दिनांक 20.2.2024 रोजी डॉ. शिरनामे सभागृह कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे येथे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती संबंधित बैठकीत राज्यातील बाजार समितीचे सभापती व सचिव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मा. पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पण कायद्यात दुरुस्त्या संबंधी दिनांक 23.2.2024 पर्यंत हरकती व सूचना मागवलेल्या आहेत त्यास अनुसरून बैठकीत चर्चा करण्यात आली.
सन 2018 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 अन्वये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सीमार्कित बाजार आवार, राष्ट्रीय बाजार तळ, बाजार तळ, उप बाजार तळ, निर्माण करणे अडते, हमाल मापाडी इत्यादी घटकावर होणारा परिणाम होऊन बाजार समित्या बंद पडतील अशी भिती व्यक्त करण्यात आली यामुळे अडते हमाल मापडी यांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे सीमार्कित बाजार आवार केल्यावर बाहेरील व्यवहारावर नियंत्रण राहणार नाही मनमानी प्रमाणे भाव ठरवून शेतकऱ्यांची फसवणूक होईल शासन नियुक्त प्रशासकीय मंडळी नेमणे ऐवजी स्थानिक शेतकरी प्रतिनिधींना प्रतिनिधित्व असावे सीमार्कित बाजार आवारामुळे त्याचे आत बाजार फी मिळेल, राज्यातील काही बाजार समित्या या केवळ नाके, जिनिंग मिल वरील बाजार फि वर अवलंबून आहेत त्या सर्व मोडकळीस येऊन बंद पडतील तसेच ज्या पायाभूत सुविधा निर्माण केलेले आहेत त्या सुविधेचे काय होणार बाजार समिती कर्जे कसे फेडणार इत्यादी बाबत शासनाने विचार करावा व सध्याचा कायदा करण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी करण्यात आली या कायद्याला विरोध करण्यासाठी सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी एक दिवसाचा लाक्षणीक संप राज्यातील बाजार समित्यांनी पुकारलेला आहे या संपात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती बाळासाहेब नाहटा, उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी, संचालक, महाराष्ट्रातील बाजार समितीचे सभापती सचिव यांनी केले आहे.
إرسال تعليق