आलमला:-शैक्षणिक सत्र 2023 -24अंतर्गत श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला ता. औसा या शाळेने शासनाने राबविलेल्या "मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा" उपक्रमात औसा तालुक्यातून सर्व द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून शाळेला 2 लाख रुपये पारितोषिक प्राप्त झाले आहे.सदरील संस्था ही ग्रामीण भागातील अतिशय उत्कृष्ट संस्था म्हणून नावारूपास आलेली आहे. या संस्थेची स्थापना स्व. ऍड एस.एस.पाटील(बाबा)व संस्थेचे पदाधिकारी सर्व संचालक मंडळ यांनी सन 1982 साली स्थापन केली. ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला, मुलींना शिक्षणासाठी केली.त्याचे आज वटवृक्षात रुपांतर झालेले दिसून येत आहे.या विद्यालयात एकूण सातशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विद्यालयात विविध स्पर्धात्मक परीक्षेची पूर्वतयारी करून घेतली जाते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये ही राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य प्राप्त केले आहे.ही एक उपक्रमशील शाळा असून या विद्यालयाने अनेक डॉक्टर, इंजिनियर्स, प्राध्यापक,वकील,शिक्षक, पोलीस,सैन्यदल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या विद्यालयाचे विद्यार्थी कार्यरत आहेत. संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळव नेहमीच शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण पूरक उपक्रमाबद्दल सहभागी असतात व विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर आहेत. "मुख्यमंत्री,माझी शाळा सुंदर शाळा" उपक्रमातही विद्यालयात विविध शैक्षणिक , सांस्कृतिक सामाजिक स्वच्छता ,विषयक तसेच पर्यावरण पूरक ,इतर सर्व 30 बाबींचे मूल्यांकन 'मूल्यांकन समितीद्वारे' परीक्षण करण्यात आले होते.या सर्व बाबींचे अहवाल, छायाचित्रे, अभिलेखे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील यांच्या नेतृत्वाने त्यांच्या सर्व शिक्षक वर्गांनी पूर्ण केले.म्हणून हे यश विद्यालयाला प्राप्त झाले आहे. तसेचआलमला केंद्रातील जि.प. प्रशाला उंबडगा( बु)ही शाळा पण जिल्हा परिषद विभागात तालुक्यात तिसरी आलेली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट उमेश पाटील, उपाध्यक्ष शिवाजी आंबुलगे,सचिव प्रभाकर कापसे,सहसचिव प्रा. नंदकिशोर धाराशिवे, कोषाध्यक्ष चनबसअप्पा निलंगेकर ,संस्थेचे जेष्ठ संचालक प्रा. जी. एम. धाराशिवे,सोपान काका आलमलेकर,मन्मथअप्पा धाराशिवे, विरनाथ हुरदळे, शिवसांब हुरदळे,नरेंद्र पाटील,माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री नागेश मापारी साहेब ,उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर साहेब, औसा तालुका गटशिक्षणाधिकारी श्री गोविंद राठोड साहेब, केंद्रप्रमुख नंदकुमार कदम, जि.प.मुख्याध्यापक वामन राठोड ,सरपंच श्री विकास वाघमारे , सर्व ग्रामपंचायतचे सदस्य , चेअरमन श्री विश्वनाथ बिराजदार, सोसायटीचे सर्व सदस्य ,पोलीस पाटील श्री सुरेंद्र पाटील ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री विरभद्र बेरूळे,गावातील प्रतिष्ठित मंडळांनी ,नागरिकांनी संस्थेचे व संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे, मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या कमिटीचे व कमिटीच्या पुढे उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचे व यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचेअभिनंदन केले आहे.
"मुख्यमंत्री,माझी शाळा सुंदर शाळा "उपक्रमात रामनाथ विद्यालयाला दोन लाखाचे पारितोषिक.
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق