लातूर : येथील व्हीएस पँथर्स ऑटो संघटनेच्या वतीने लातूर शहर मनपा आयुक्तांना निवेदन देऊन लातूर शहरात धावणाऱ्या एलएमटी सिटी बस चा थांबा गंज गोलाई येथून काढून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत एल एम टी बसचा कायमस्वरूपी थांबा करण्यात यावा या थांब्यामुळे गोलाई मधील ट्रॅफिक सुद्धा कमी होईल आणि वाहतुकीला शिस्त सुद्धा निर्माण होईल यासाठी हा थांबा लवकरात लवकर सुरू करून ऑटो चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या ऑटो चालकांना सहकार्य करावे हा एल एम टी बस थांबा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी लवकरात लवकर हलवण्यात यावा अन्यथा व्ही एस पँथर्स ऑटो संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची गंभीरतेने दखल घेण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन माननीय आयुक्त यांना देण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष देवा भाऊ गायकवाड विलास कसबे ,नारायण कांबळे, बालाजी सोनवणे, राजू पठाण, अखिल सय्यद, दिलीप सूर्यवंशी विशाल सातपुते ,प्रशांत सातपुते, मनोज लोखंडे, सचिन बनसोडे, समाधान ढोबळे, जगदीश सरवदे श्रीनिवास कांबळे ,गणेश कसबे, विष्णू पाटील, समाधान गायकवाड ,अमोल कांबळे रमाकांत कुडके, राजकुमार गांधले, मनोज जय मल्हार ,अमोल भालेराव, अजय काळे, रतन आप्पा मस्के ,पप्पू सोनवणे, बालाजी सोनवणे स्वाक्षऱ्या आहेत.
व्ही एस पँथर्स ऑटो संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق