औसा येथे लोकसभा निवडणूक पुर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी घेतला आढावा
औसा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.भारत कदम यांनी औसा विधानसभा मतदार संघातील लोकसभा निवडणूक पुर्वतयारीचा आढावा घेतला. सर्वप्रथम निवडणूक नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी प्रास्ताविक करुन निवडणूक तयारी बाबत सादरीकरण केले त्यानंतर आढावा घेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भारत कदम यांनी निवडणूकीसाठी नियुक्त सर्व क्षेत्रीय अधिकारी,नोडल अधिकारी ,आचारसंहिता पथक,भरारी पथक ,स्थिर पथक ,व्हीडीओ फिरते पथक खर्चविषयक पथक,सर्व तलाठी सर्व मंडळ अधिकारी याना त्यांच्या कर्तव्य व जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यामध्ये मतदान केंद्रावरीलAMF/EMF सुविधा,पाणी,लाईट ,स्वछता गृह ,रैंप,फर्निचर व्यवस्था,मतदारासाठी सावली शेड इत्यादी सुविधाची पाहणी करणे बाबत सूचना दिल्या.दिव्यांग व ८० वर्षारावरील नागरिकांना टपाली मतपत्रिका सुविधा कार्यपध्दती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व त्याबाबत सुक्ष्म नियोजन करुन बीएलओ तलाठी मंडळ अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांनी जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश दिले निवडणूक विषयक विविध आय टी aaplication ची माहिती देत असताना सर्वसामान्य नागरिकासाठी असलेले सुविधा ऍप,व्ही एच ए ऍप,सी विजिल ऍप,वोटर टर्नआउट ऍप,know your candidate ऍप,वोटर portol ऍप तसेच राजकीय पक्ष व उमेदवार यांचेसाठी उपलब्ध असलेले कैंडिडेट ऍप ,PPRTMS APP,SUVIDHA APP त्याचबरोबर कार्यालयीन अधिकारी यांचेसाठी असलेले बूथ ऍप,मॉनिटर ऍप,डिसायडर ऍप,ems ऍप ,इरोनेट ,नोडल ऍप,इन्व्हेस्टिगेटर ऍप,एनकोर portol,आब्जर्वर portol ESMS इत्यादी विषयी सखोल माहिती दिली व याची व्यापक प्रसिद्धी व वापर करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी निवडणूक पुर्वतयारी आढावा घेत औसा मतदारसंघातील क्रिटिकल मतदान केंद्र,व मागील निवड णुकी दरम्यान कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राचा आढावा घेऊन त्या मतदान केंद्रावर मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रम घेणेबाबत सूचना दिल्या.मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी व संपर्कासाठी कम्युनिकेशन प्लॅन व रूट झोन आराखडा तयार करणे,वेब कास्टिंग साठी मतदान केंद्र निःशीत करणे,pwd मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करणे ,महिला मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र तयार करुन त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे,मतदान अधिकारी याना दर्जेदार प्रशिक्षण देणे,सर्व क्षेत्रीय अधिकारी,नोडल अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी यांनी एव्हीएम vvpat प्रशिक्षण घेणे यांनी महिला मतदान अधिकारी यांचेसाठी विशेष व्यवस्था करणे,सर्व मतदान केंद्रावर आरोग्य पथक नेमणूक करणे,मतदार केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून NSS/NCC SCOUT GUIDE यांची मदत घेणे याबाबत नियोजन करणे बाबत संबधित अधिकारी याना सूचना दिल्या.निवडणुक प्रक्रिया पार पाडत असताना काहीतरी नाविन्यपुर्वक उपक्रम घेऊन लोकाना मतदानासाठी प्रोत्साहित करावे ,राजकिय पक्ष,पत्रकार यांचेशी निवडणूक प्रक्रियाबाबत वारंवार सुसंवाद ठेवणे त्यानी वेळोवेळी माहिती देणे याबाबत सूचना दिल्या त्याचबरोबर तलाठी यांचा आढावा घेत असताना मतदान केंद्रावर मतदान अधिकारी यांची व्यवस्था करणे व निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांच्या कार्य क्षेत्रातील माहिती वेळोवेळी वरिष्ट अधिकारी याना देणे गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागात व मुख्याधिकारी यांनी शहरी भागात आचारसंहितेबाबत कडक अंमलबजावणी करावी सर्व विभागप्रमुख यांनी सुद्धा आचारसंहिता बाबत सजग व जागृत कामकाज करावे अशा सूचना दिल्या शेवटी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भारत कदम व जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी मतदार संघातील तयारी विषयी समाधान व्यक्त करुन सर्व निवडणूक टीम चे अभिनंदन केले सदर आढावा बैठकीसाठी औसा रेणापूर चेउपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे तहसीलदार भरत सूर्यवंशी,अपर तहसीलदार निलेश होणमोरे,गटविकासविकास अधिकारी युवराज म्हेत्रे ,मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे ,औसा पीआय रेजितवाड,किल्लारी एपीआय केदार,कासार सिरशी एपीआय शेख ,नायब तहसीलदार पंकज मंदाडे,इंद्रजीत गरड सुरेश पाटील अजय पाटील दत्ता कांबळे सर्व विभागप्रमुख,सर्व क्षेत्रीय अधिकारी,नोडल अधिकारी ,पोलीस अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी तहसील कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
إرسال تعليق