महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी व तहसील कार्यालयाच्या वतीने मतदार नोंदणीसाठी स्वीप अंतर्गत विविध कार्यक्रम

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी व तहसील कार्यालयाच्या वतीने मतदार नोंदणीसाठी स्वीप अंतर्गत विविध कार्यक्रमनिलंगा/प्रतिनिधी (रविराज मोरे)-महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी ,निलंगा राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे निवडणूक आयोग विभाग तहसील कार्यालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणीसाठी स्वीप अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनील गरड यांनी केले.याप्रसंगी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा चे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील ,नायब तहसीलदार एस. ए. पठाण निवडणूक विभाग प्रमुख कावळे मॅडम, मोरे सर, गटशिक्षण अधिकारी सुरेश व्ही. गायकवाड साहेब शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) हा भारतातील निवडणूक आयोगाचा मतदार शिक्षण, मतदार जागृती आणि मतदार साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी प्रमुख कार्यक्रम आहे. अशी माहिती दिली व नायब तहसीलदार एस. ए.पठाण साहेबांनीSVEEP ध्येय आणि दृष्टी विद्यार्थ्यांस प्रामुख्याने  निदर्शनास आणून दिली.१. प्रत्येक नागरिकाला मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी आणि प्रत्येक निवडणुकीत माहितीपूर्ण आणि नैतिक पद्धतीने मतदान करण्यासाठी प्रबोधन, सक्षम करणे. २.निवडणुका आणि लोकशाहीमध्ये नागरिकांचा सार्वत्रिक आणि प्रबुद्ध सहभाग.SVEEP स्ट्रॅटेजी IV व्हिजन डॉक्युमेंट उद्दिष्टे (2022-25):2022-25 च्या रणनीती दस्तऐवजानुसार SVEEP साठी संकल्पित उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी 75% पर्यंत वाढवा:प्रत्येक मतदान केंद्राची मतदार यादी शुद्ध करणे.नावनोंदणी आणि मतदानातील लिंग अंतर कमी करणे.लक्ष्यित हस्तक्षेप, तांत्रिक उपाय आणि धोरणात्मक बदलांद्वारे सर्व गैर-मतदार/ उपेक्षित वर्गांचा समावेश सुनिश्चित करणे निवडणुकीतील सहभागाबाबत शहरी आणि तरुणांच्या उदासीनतेला संबोधित करणे
सर्व कमी मतदान असलेले मतदारसंघ आणि मतदान केंद्रांवर फिरणे सतत निवडणूक आणि लोकशाही शिक्षणाद्वारे माहितीपूर्ण आणि नैतिक मतदानाच्या दृष्टीने निवडणूक सहभागाची गुणवत्ता वाढवणे.यावर सखोल असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाची सांगता.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक सुनील गरड यांनी केली.या कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणी व ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. डॉ. सी. व्ही. पांचाळ प्रा. डॉ. संतोष कुंभार प्रा. रवी मोरे, प्रा. नंदा भालके व प्रा.विनोद उसणाळे यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم