स्पर्श इंग्लिश शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

स्पर्श इंग्लिश शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
औसा/ प्रतिनिधी: - औसा येथील स्पर्श इंग्लिश शाळेचा 7 वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष परवेझ मोकाशी दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ विभाग, औसा हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राहुलकुमार भोळ एपीआय भादा, तसेच एपीआय लातूरचे अक्रम मोमीन, साई बहुदेशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. हनीफा शेख मॅडम, संस्थेच्या सचिव शब्बीर शेख सर, स्पर्श इंग्लिश शाळेचे संचालक मोईज शेख व सुलतान शेख उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना स्पर्श इंग्लिश शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक सय्यद मॅडम यांच्या उद्घाटन समारंभाचे भाषण केले तसेच पारंपारिक पद्धतीने दिपप्रज्वलन करण्यात आले. समारंभात शाळेचा सर्वात मोठा सोहळा साजरा करून संपूर्ण शाळेचा परिसर फुलांनी आणि रोषणाईने सजविण्यात आला होता. या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी एका उत्साही स्वागत गीताने करून सादर केले. त्यानंतर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पूर्व-प्राथमिक कारे मयुरी दिलीप, कारभारी समर्थकुमार प्रथमिक, जाधव शेजल प्रशांत, सलगार अडविक राजेश, सर्वोत्तम पालक श्री आणि श्रीमती राठोड नितीन, श्रीमान आणि सौ शेख जोरसाब, उत्कृष्ट शिक्षक वैजवाडे मनीषा, बाळकृष्ण, दीक्षित सुमीत मनोहर. यानंतर, एकामागून एक, इयत्ता प्ले ग्रुप ते 6 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अप्रतिम नृत्य सादरीकरण झाले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पालकावर आधारित एक छोटा नाट्य सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी नृत्य सादरीकरण झाले, ज्यामध्ये सर्व प्राथमिक विद्यार्थी, नृत्यदिग्दर्शकांनी एकत्र नृत्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घासे दक्ष, पिंपळे आरव, शेख सबूर आणि जगदाळे सर यांनी केले, तर आभार शिंदे सर यांनी मानले, सदर स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या व शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم