वार्षिक स्नेहसंमेलन चक्रधर शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न

वार्षिक स्नेहसंमेलन चक्रधर शाळेत मोठ्या 
उत्साहात संपन्न
औसा प्रतिनिधी : - औसा शहरातील नवजीवन सेवाभावी संस्था द्वारा संचलित चक्रधर प्राथमिक व माध्यमिक या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले असून यावेळी कार्यक्रमाचे  उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख होते तर कार्यक्रम अध्यक्ष म्हणून काॅग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरभैय्या खानापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच या प्रसंगी युवक काँग्रेस लातूर जिल्हा उपाध्यक्ष हणमंत भैय्या राचट्टे, माजी नगराध्यक्ष जावेदजी शेख, माजी नगरसेवक गोपाळजी धानूरे, युवा उद्योजक इम्रान सय्यद, कृ. उ. बा. समिती संचालक
विकासजी नरहरे, माजी नगरसेविका सौ. मंजुषाताई कसबे, कार्याध्यक्ष तालुका काँग्रेस)
 प्रशांतजी भोसले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शहेबाज उस्मानी, संस्थापक सचिव शब्बीरजी शेख यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत सुमन गीताने करण्यात आले. तसेच उपस्थिती मान्यवरांचे वृक्षरोप, शॉल, श्रीफळ व फेटे बांधून  सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे संस्थेतर्फे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, यात यावर्षीचा आदर्श शिक्षक म्हणून  मुल्ला रौफ सिकंदर, धानुरे आशिष विश्वंभर यांना तर आदर्श पालक म्हणून, पटेल अखलाख सालार व सातपुते महादेव यांना प्रदान करण्यात आला. तसेच आदर्श विद्यार्थी म्हणून कु. शिंदे ब्रह्मानंद व्यंकट, कु. करपुडे इसमाईल अजीम, कु.पवार अदिती दयानंद, कु.शेख अदनान गणी या विध्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते शॉल,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमास शुभेच्छा, तसेच शाळेचे, संस्थेची कार्यकारिणी यांचे कौतुक आपल्या शब्दांत केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमात विविध गीते जसे हरियानी, गरबा, दांडिया, देशभक्ती गीत,मंगळागौर, नाटक, गीतगायन, इत्यादी अश्या २५ गीतावर विद्यार्थ्यानी आपले कलागुण (नृत्यगीत) सादर केले.या कार्यक्रमास महिला पालक, पाहुणे, पत्रकार,विविध शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका, ईतर कर्मचारी, विध्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा कार्यक्रम खास माता-भगिनींसाठी (नारी सशक्तीकरण करिता)आयोजित केला होता. हा संपूर्ण कार्यक्रम सोशल मीडिया फेसबुक पेजवर लाईव्ह ठेवण्यात आला आहे. याच्या माध्यमातून  खूप पालकांनी हा कार्यक्रम पाहिला, त्याचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक आंदुरे सर यांनी केले तर, आभार अझहर सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षिका, इतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली. शाळेचे मुख्याध्यापक सुलतान शेख सर, मुख्याध्यापक मोईज शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

أحدث أقدم