जिहादी वृत्तीला सरकारने लवकरात लवकर आळा घालावा व या नराधमाला फाशीची शिक्षा करण्यात यावी - अभाविप लातूर
लातूर /प्रतिनिधी- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर शाखे तर्फे वलांडी ता. देवणी येथे सात वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात गांधी चौक लातूर येथे निषेध व्यक्त करण्यात आला.
देवणी तालुक्यामध्ये असलेल्या वलांडी गावामध्ये सहा वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार केले. जिहादी वृत्तीची मानसिकता असणाऱ्या या नराधमाने अवघ्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्यानंतर अभावी लातूर तर्फे या वृत्तीचा निषेध गांधी चौक लातूर येथे करण्यात आला व या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
"जिहादी वृत्ती असणाऱ्या लोकांकडून समाजातील महिला सुरक्षित नाहीत अशा वृत्तीला आळा घालण्याचे काम सरकारने करावे, हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या सरकारला रामराज्य व स्वराज्यातल्या महिला कशा सुरक्षित राहत होत्या याचा विसर पडलेला दिसतोय आणि या सरकारचा धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे जिहादी वृत्तीचे नराधम अशा घटना करताना दिसत आहेत. सरकारने या जिहादी वृत्तीच्या विरोधात कठोर कारवाई करावी."असे मत अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री सुरज साबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रदेश सहमंत्री सुरज साबळे,जिल्हा सह संयोजक योगेश कुलबुदे, महानगर सहमंत्री नरेंद्र ठाकूर,पश्चिम नगर मंत्री सागर वाडीकर,वैष्णवी शिंदे, तेजुमाई राऊत ,वैष्णवी शितोळे,अभी गजबरे, आदित्य गायकवाड,प्रवीण शिंदे,पंकज रामावत व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
إرسال تعليق