औसा/प्रतिनिधी- टिचर ट्रेनिंग प्रोग्राम घेण्याचा उद्देश म्हणजे अध्यापन आणि शिक्षण हा जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसायांपैकी एक मानला जातो. असे डॉ सतीश भिसे यांनी सांगितले. श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर व लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवशीय टीचर ट्रेनिंग प्रोग्राम कार्यशाळेचे आयोजन लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर महाविद्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून औषधनिर्माण शास्त्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय कराड चे माजी प्राचार्य डॉ. सतीश भिसे लाभले होते. तसेच या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला, प्राचार्या डॉ.श्यामलीला जेवळे, डॉ. नितीन लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व राष्ट्रगीताने करण्यात आली. डॉ सतीश भिसे पुढे बोलत असताना शिक्षक केवळ विद्यार्थ्यांची योग्यता विकसित करत नाही तर अप्रत्यक्षपणे समाजाच्या वर्तनाचे नियमन करतो. शिक्षक हा प्रख्यात अभियंते, डॉक्टर, पत्रकार आणि इतर व्यावसायिकांचा निर्माता असतो. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संवाद कसा असावा, विषयामध्ये आवड कशी निर्माण करायची, आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षकांची काय भूमिका असावी याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दररोज नवनवीन माहिती फार्मसी व इतर क्षेत्रामध्ये अद्यावत होत आहे त्यासाठी प्रत्येक शिक्षकांना अवगत व्हावी व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकविता येण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे" असे प्रतिपादन वेताळेश्वर बावगे यांनी केले. कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी मनोगत व्यक्त करताना "श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून ते आज पर्यंत फार्मसी क्षेत्रामध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून संस्था दर्जेदार शिक्षण देत आहे" असे यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.श्यामलीला जेवळे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. अक्षता लासूरे तर आभार प्रदर्शन प्रा. अतुल कदम यांनी केले. या कार्यशाळेस सर्व प्राध्यापक वृंदांनी सहभाग नोंदविला.
إرسال تعليق