पुणे -साहित्य हा समाजाचा खरा आरसा असून त्याचे प्रतिबिंब हे साहित्यिकांच्या कॄतीतून नेहमीच दिसते. असे उद्गार ज्येष्ठ गझलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी काढले.
साहित्य सारथी कला मंच व पूना कॉलेज तर्फे आयोजित गझल मुशायरा व खुले कविसंमेलन पार पडले.
यावेळी ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते.साहित्य सारथी महाकाव्य स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व काव्यसंग्रह देऊन सन्मानित करण्यात आले.
गेली अनेक वर्षे साहित्यिक लेखणीतून समाजाला नवी दिशा देण्याचे काम साहित्यिक नेहमीच करत आले आहेत.
*मागच्या काही काळात ज्येष्ठ साहित्यिकांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम तरुणांनी काढावी असे आवाहन डॉ.सांगोलेकर यांनी अध्यक्षीय मनोगतात काढले.*
याबरोबरच तरुणांच्या लेखणीतून ही ज्ञानाची मशाल प्रखर होण्याची गरज आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा गझलकार सागरराजे निंबाळकर उपस्थित होते.
त्यांनी आपल्या मनोगतात साहित्य सारथी कला मंच च्या महाकाव्य स्पर्धेतील सहभागी कवींचे व उपक्रम यशस्वी राबविले त्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी
स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. मोहम्मद शाकीर शेख उपस्थित होते.
गझल मुशायरा सत्राचे ओघवते व अभ्यासपूर्ण सुत्रसंचालन ज्येष्ठ कवयित्री व गझलकारा रुपालीताई अवचरे यांनी केले,
तर कविसंमेलनाचे सुत्रसंचालन कवी गजानन उफाडे व प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे कार्याध्यक्ष दिनेश कांबळे यांच्या *बहारदार* सुत्रसंचालनाने झाली.प्रास्ताविक साहित्य सारथी कला मंच पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटोळे यांनी मांडले, तर आभार संस्थेचे संस्थापक सुरेश धोत्रे यांनी मानले.
कार्याध्यक्ष दिनेश कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचा समारोप कविसंमेलनातील तीन उत्कृष्ट कवितांना रोख रक्कम बक्षीस देऊन करण्यात आला.
إرسال تعليق