शेतकरी आत्महत्या का होतात?

शेतकरी आत्महत्या का होतात? शेतकऱ्याच्या आत्महत्याबाबत राज्य विधी मंडळात तसेच लोकसभेत अनुक्रमे आमदार आणि खासदार तावा तावाने बोलत असतात. हे आपण  माध्यमातून पाहत असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दु:खद आहेत. कोणत्या कारणामुळे त्याने आत्महत्या केली उदाहरणार्थ कर्जाची परतफेड न झाल्यामुळे ,पाल्याच्या शिक्षणासाठी फी भरण्यासाठी पैसे मिळाले नाहीत , शेतात पेरणी करण्यासाठी मशागतीसाठी वेळेवर पैसे मिळाले नाहीत, मुलीच्या लग्नासाठी पैसे मिळाले नाहीत अशा अनेक कारणाने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे आपल्या ऐकण्यात येते. प्रामुख्याने एखाद्या संस्थेकडून शेती कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड न करता आल्यामुळे वैतागून वैतागून त्याने आत्महत्या केल्याचे ऐकण्यात येते.   for example एका शेतकऱ्याने २०१७ मध्ये रुपये 17000 खरीप हंगामासाठी पेरणी वगैरे बी बियाणे घेण्यासाठी त्यांनी सदरील कर्ज घेतले. त्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे गरिबीमुळे त्याला सुमारे पाच वर्ष व्याजाचा भरणा करता आला नाही आणि कर्जमाफी मिळत आहे असे त्या शेतकऱ्याच्या ऐकण्यात आल्यामुळे तो शेतकरी त्या संस्थेत गेला आणि त्यांनी विचारणा केली तर त्याला असे उत्तर मिळाले की कर्जमाफी वगैरे काही नाही तुम्ही 2018 पासून 9000 पेक्षा अधिक व्याजाचा भरणा करा मग तुम्हाला परत खरीप हंगामात 17 हजार रुपये कर्ज मिळेल हे ऐकल्यानंतर त्या शेतकऱ्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. आता याबाबत आपण चर्चा करू शेतकऱ्यांच्या आत्महत्या बाबत राज्य विधिमंडळ तसेच लोकसभेत लोकप्रतिनिधी यांची तावा तावाने वातानुकूलित सभागृहात बसून टेबलवर येणारे विविध खाद्यपदार्थ चहा बिस्किट यांचा आस्वाद घेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वर होणारी चर्चा गंभीरच असेल असे आपण म्हणूया मात्र वर म्हटल्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याने त्याला सुमारे नऊ टक्के व्याजाचा भरणा गरिबीमुळे करता आला नाही. त्यावर चक्रवाढ व्याज आकारणी करण्यात आले असेल तर तो शेतकरी त्या कर्जाच्या सापळ्यात अडकणार, नाही कशावरून त्याला दोन एकर जमीन तीही कोरडवाहू शेती आणि कर्जाच्या सापळ्यात अडकला तर त्याला कोण सोडवणार? विधिमंडळात लोकसभेत चर्चा करणारे त्या शेतकऱ्याचे व्याज थोडेच भरणार आहेत. कोणी भरत नसते फक्त आस्था दाखवतात. कोणी कोणाला एकही रुपया देत नसतो फक्त शेतकऱ्या विषयी कळवळा दाखविणे असे 70 वर्षे चालले आहे आणि आता म्हणतात या सरकारने काय केले ह्या सरकारने बरेच केले जे तुम्हाला सत्तर वर्ष करता आले नाही. अशी जनता म्हणते. आपण ऐकतो या सत्यता असेलच ना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रति महिना पाचशे रुपये आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति महिना पाचशे रुपये असे एकूण वार्षिक बारा हजार रुपये मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना  वैद्यकीय सुविधा मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तसे सणावाराला आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. काल-परवा शिवजयंती आणि श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा या निमित्ताने राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला या अगोदर शासनाने   निमित्त आनंदाचा शिधा वाटप केलेला आहे. साखर, गोडेतेल, रवा, कच्चे पोहे, चणाडाळ याचा दर्जा चांगला होता. मात्र यावेळेस गोड तेलाचा दर्जा चांगला नसल्याचे ऐकण्यात येत आहे. गोड तेल घट्ट पामतेलासारखे घट्ट असल्यामुळे खाण्यास योग्य नसल्याचे ऐकण्यात येत आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवा भाऊ फडणवीस अजित दादा पवार यांनी लक्ष घालायला हवे अशी मागणी करण्यात येत आहे. थोडे विषयांतर झाले तरी हाही भाग शेतकरी कुटुंबासाठी अविभाज्य घटक आहे म्हणजे आनंदाचा शिधा बुडत्याला काडीचा आधार. आता मूळ विषयकडे वळूया एखाद्या शेतकऱ्याने वर म्हटल्याप्रमाणे वर्ष 2017 मध्ये 17 हजार रुपये शेती कर्ज घेतले. त्याला आजपर्यंत गरिबीमुळे व्याजाचा भरणा करता आला नाही आणि कर्जमाफी मिळणार आहे. असे त्याला ऐकण्यात आले म्हणून तो शेतकरी त्या संस्थेत गेला त्यांनी विचारणा केली असता त्या शेतकऱ्याने कर्जमाफी वगैरे म्हटल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी कानावर हात ठेवले आणि स्मित हास्य करून त्या शेतकऱ्याकडे  वेडेवाकडे पाहून मामा असे काही नाही कर्ज माफी वगैरे काही नाही तुम्हीही 9000 व्याज भरल्यानंतर तुम्हाला सतरा हजार पुन्हा कर्ज घेता येईल असे उत्तर मिळाले.  तो शेतकरी अल्पभूधारक कोरडवाहू शेती मुलाचे शिक्षण मुलीचे लग्न आजारपण आणि दररोजचा उदरनिर्वाह कसा करायचा हा त्याच्या समोर फार मोठा एक प्रश्न ? मित्रांनो कोणीही पुढारी गरीब शेतकऱ्यांचे व्याजाचा भरणा करत नाही. भाषणात येतात शेतकरी मेल्यानंतर मोर्चे काढतात. शेतकरी संघटना असो कोणी असो हे सत्य नाकारून कसे चालेल. एखाद्या शेतकऱ्याने व्याजाचा भरणा केला नाही म्हणून त्या शेतकऱ्याचे त्याच बँकेत चालू खाते असते त्या खात्यावर थोडे बहुत सरकारकडून आलेल्या अनुदान उचलावे म्हणून तो शेतकरी बँकेत गेला तर त्याची अडवणूक होत असेल तर योग्य म्हणता येणार नाही. तुमच्यावर कर्ज आहे व्याज आहे त्याचा आधी भरणा करा आणि मग हे पैसे उचला असेही ऐकण्यात येत आहे. मग शेतकरी आत्महत्या का करतो ? याचे उत्तर त्यात दडलेले आहे मित्रांनो आम्हाला कोणावरही अकारण टीका टिप्पणी करावयाची नाही. समाजातील वास्तव नाकारता येणार नाही. आपण म्हणतो शेतकऱ्यांना तारणार याबाबत मोर्चे निवेदने सर्व होते काही शेतकरी संघटना शेतकऱ्यांची बाजू घेतात काही मूग गिळून गप्प बसतात हे आपण ऐकले असेलच. मग सांगा शेतकऱ्याने आत्महत्या का केली कशासाठी केली? याचे उत्तर मिळायला अधिक खोला जाण्याची गरज नसावी असे वाटते. ही चर्चा आहे मित्रांनो हे वास्तव आहे ? या समाजातील जे प्रमुख आधार आहेत अशा मान्यवरांनी या बाबीकडे लक्ष द्यायला हवे.  राज्यातील अशा कोरडवाहू शेतकऱ्यांच्या व्याज भरणा करण्याची व्यवस्था अशी मोठी धनिक मंडळी करू शकतात भाषणात टाळ्या तर मिळतातच परंतु वास्तवाचे भान ठेवून शेतकऱ्यांना मदत केली तर तो सुदिनठरेल विद्यमान राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना आपापल्या परीने मदत करीत आहेत. परंतु राज्यातील इतर सहकारी संस्थांनी ही वास्तव स्वीकारून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत करावी हे शेतकऱ्यांचे दुःख मांडत आहोत. आम्ही बाकी काही नाही.
मित्रांनो आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
(प्रस्तुत पत्रकार असून faculty of social sciencesसामाजिक शास्त्रे अभ्यासक आहेत)

विलास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार औसा
9552197268 

Post a Comment

أحدث أقدم