महिलांनी स्वतःच्या प्रगतीवर भर द्या-अदितीताई कव्हेकर पाटील
हासेगाव फार्मसीत जागतिक महिला दिन साजरा
औसा : ( प्रतिनिधी) आज जागतिक पातळीवर महिला दिन हा सर्वात जास्त साजरा केला जातो हे एक समाज सुधारण्याचे लक्षण आहे. आणि आपण आपल्या असपास पाहिल्यावर असे लक्षात येईल कि ज्या ज्या क्षेत्रात महिलांना संधी मिळाली आहे त्या त्या क्षेत्रामध्ये महिलांनी प्रगती करून आपले वेगळे पण दाखवले आहे. असे प्रतिपादन अदितीताई कव्हेकर पाटील यानि केले. श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना द्वारा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जे.एस.पी.एम. संचालिका अदितीताई कव्हेकर पाटील, हासेगावच्या सरपंच शालूबाई राठोड , संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, संस्थेच्या उपाध्यक्ष जयदेवी बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे , कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालिका माधुरी बावगे,सीमा बावगे , संचालक नंदकिशोर बावगे , प्राचार्या डॉ.शामलीला बागवे(जेवळे), प्राचार्य डॉ. बुमरेला श्रीनिवास ,सलीम शेख व्यासपीठावर उपस्थित होते.
अदितीताई पुढे बोलत असताना म्हणाल्या की,आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे हे अभिमानाची बाब आहे पण दुसरीकडे समाजात पाहत असतानास्त्री स्त्रीचा द्वेष करत आहे. महिलांनीच एकजुटीने राहून आपली प्रगती कशी होईल याकडे पाहण्याची गरज आहे.असे सांगून महाविद्यालय च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेत आकांशा भोसले , वेषभूशा भक्ती शिंदे आणि प्रा.स्नेहा वैरागकर ,एस व्ही एस.एस. वूमन्स अवार्ड प्राची मेन्शेटी प्रा. महाजन प्रगती अशा स्पर्धेत विजयी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सचिव वेताळेश्वर बावगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा जी बनसोडे , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्नेहा वैरागकर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आय टी आय हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पटेल ए. यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. दीपक जोशी केले.
إرسال تعليق