निलंगा/प्रतिनिधी-शहरातील जागतिक जल दीन कार्यक्रमाचे आयोजन दि.२२ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथील सभागृहात आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
जागतिक जल दिन आणि पाणी बचतीच्या व्यक्तिगत सवयी मध्ये बदल या विषयावर महाविद्यालयातील ग्रीन क्लब च्या माध्यमातून १.पोस्टर बनवणे.२.रिल/शॉर्ट व्हिडिओ बनवणे.या कार्यक्रमात ग्रीन क्लब मधील विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन क्लब युवा उपाध्यक्ष लादे नम्रता सतीश यांनी केले.याप्रसंगी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा चे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील , दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी चे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. श्रीशैल्य गुरगुरे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. सुनिल गरड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या अनुषंगाने डॉ.श्रीशैल्य यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना खालील बाबी मांडल्या पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.जागतिक जल दिवस का साजरा करण्यात येतो व आपल्या शरीरात गोड पाणी किती प्रमाणात आहे व त्याचे काय महत्त्व आहे याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.एस.पाटील यांनी पाण्याची महत्त्व पटवून देत असताना कर्मवीर कै.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा दूरदर्शी आराखडा ज्यामुळे निलंगा तालुक्यात निलंगा वासियांना पिण्यायोग्य पाणी मिळत असल्याचे, व तसेच लोकसंख्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे, त्यामुळे संवर्धन करणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांमधून कु.आगलावे गायत्री पाटील कृष्णा शिवाजीराव यांनी व्याख्यान केले. या व्याख्यानात त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदाहरणार्थ जागतिक जल दिन 2024 'शांततेसाठी पाण्याचा वापर'' या थीमवर लक्ष केंद्रित करेल.या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे१.पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.२.पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.३.जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे, त्यामुळे कमी प्रमाणात वापर करणे४.पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे. असे विचार मांडले.त्यानंतर ग्रीन क्लब मोहीम समन्वयक विद्यार्थी अंबड रवींद्र सुनील यांनी जागतिक जल दिन निमित्त शपत घेऊन प्रवर्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.रविराज मोरे यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजक फॅकल्टी कॉर्डिनेटर प्रा.परवेज शेख होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. डॉ. संतोष कुंभार, प्रा.नंदा भालके, प्रा.विनोद उसणाळे व प्रा सुशांत मचपल्ले यांनी अथक परिश्रम घेतले.हा कार्यक्रम विद्यार्थी केंद्रीभूत करून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी याकरिता प्रस्ताविक , भाषण , शपथ घेणे, पोस्टर्स, रील निर्मिती करणे याकरिता विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला.
إرسال تعليق