हासेगाव फार्मसी'चे तब्बल १९१ विद्यार्थी नौकरीत रुजू , रोजगार क्षमता कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

हासेगाव फार्मसी'चे तब्बल १९१ विद्यार्थी नौकरीत  रुजू , रोजगार क्षमता कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 
              औसा (प्रतिनिधी ) श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयात कार्यशाळाव वर्कशॉप वारंवार  घेत असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थीसाठी फायदेशीर ठरत आहे याचाच एक भाग म्हणून , इंटर्नल कॅलिटी अशुरन्स सेल लातूर आणि अस्पायरिंग करिअर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन दिवशीय रोजगार क्षमता कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.  महाविद्यालयातील आतापर्यन्त चतुर्थ वर्षातील ३८० विद्यार्थ्यांपैकी १९१ विद्यार्थी विविध नामांकित कंपनी आणि  शासकीय नौकरीत रुजू आहेत . 
        या प्रसंगी प्रमुख पाहुणे  पुणे येथील अस्पायरिंग करिअर्स, प्रोग्राम ट्रेनर डॉ. नलावडे सोमनाथ, संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे ,  कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे  प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे(जेवळे) डॉ लोणीकर नितीन प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर प्रा. अजगुंडे बालाजी मंचावर उपस्थित होते.                  रोजगार क्षमता कौशल्य प्रशिक्षणात महाविद्यालयातील बी फार्मसी ,डी फार्मसी आणि एम फार्मसी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिष्टाचार, देहबोली ,बोलण्याची योग्य पद्धत ,सामर्थ्य  आणि कमजोरी ,प्रभावी ऐकणे ,वाटाघाटी कौशल्य , वेळेचे व्यवस्थापन ,सादरीकरण तयार करणे , प्रेक्षकांसमोर सादर करणे आदी विषयासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. 
     रोजगार क्षमता कौशल्य प्रशिक्षणात महाविद्यालयातील १२० विद्यार्थी सहभागी झाले होते आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आले. 
                  यावेळी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आय टी आय हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर सर्व  प्राचार्य  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते .  
       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सय्यद झहीर आणि  आभारप्रदर्शन विद्यार्थिनी शेख सभा यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم