महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीत जीपॅट नायपर एक्स्पर्ट लेक्चर संपन्न


महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीत जीपॅट नायपर एक्स्पर्ट लेक्चर संपन्न 
निलंगा :  येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय ,"जी-पॅट सेल" व "फंडामेंटल फार्मसी, संभाजीनगर"यांच्या संयुक्त विद्यमाने जी- पॅट नायपर एक्सपर्ट लेक्चर चे दि. 2 एप्रिल रोजी  आयोजन करण्यात आले.
जी-पॅट नायपर एक्सपर्ट लेक्चर चे यशस्वी केल्याबद्ल विद्यार्थ्यांचे व शिक्षक कर्मचा-यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. विजय पाटील निलंगेकर यांनी कौतुक केले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून फंडामेंटल फार्मसी, संभाजीनगर चे CEO श्री. सचीन जाधव, जी-पॅट सेल चे प्रा. सुनिल गरड, प्रा. डॉ शरद उसनाळे, डॉ. चंद्रवदन पांचाळ व कार्यक्रमाचे co-ordinator (कोऑरडीनेटर)  प्रा. सुमीत बुये वरिष्ठ प्रा. डॉ. एस.पी. कुंभार, डॉ. एम. ए. शेटकार, प्रा. आर. आर- मोरे उपस्थित होते. जी-पॅट नायपर या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येत असलेल्या स्पर्धापरीक्षेच्या तयारी करीता या एक्सपर्ट लेक्चर चे आयोजन केले गेले. या परीक्षेकरीता लागणाऱ्या सर्व बाबींचा उहापोह करत असताना सचीन जाधव सरांनी, त्यांनी लिहीलेली पुस्तके महाविद्यालयातील विद्यार्थी-विध्यार्थीनींना भेट दिली.
सूत्र संचलन प्रा.सुनिल गरड यांनी केले. हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.विनोद उसनाळे, प्रा. शिवराज हुनसनाळकर, प्रा..इर्षाद शेख, प्रा.परवेज शेख, प्रा. सुजीत पवार, प्रा. नंदा भालके, प्रा. प्रिती माकणे, प्रा. माचपलॆ सुषांत , प्रा. सुरज वाकोडे व बालाजी वाल्मिकी,विशाल गिरी, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم