रामनाथ विद्यालयात एका आदर्शाचा वाढदिवस साजरा

 रामनाथ विद्यालयात एका आदर्शाचा वाढदिवस साजरा
 अलमला-श्री विश्वनाथ शामराव बिराजदार, चेअरमन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आलमला यांचा  3.4. 2024 रोजी 71वा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने त्यांनी श्री रामनाथ विद्यालयास सदिच्छा भेट देऊन 11 हजार रुपये  शैक्षणिक साहित्य साठी गोरगरिबांच्या मुलांना मदत व्हावी म्हणून मदत केली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी आलमला येथील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी आदर्श व्यक्तिमत्व अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा करतात. कधी वृक्ष लागवड ,कधी शालेय साहित्याचे वाटप ,तर कधी मुलांना खाऊ देऊन शैक्षणिक वातावरण तयार करण्यामध्ये गावातील सर्व कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या उपक्रमाबद्दल त्यांचा काल रामनाथ विद्यालय येथे बोलावून शिक्षण संस्थेच्या व कर्मचाऱ्यांच्या वतीने  रंगनाथ आंबुलगे , मुळे पी.के, हुरदळे पी.एस. यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला .याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने विश्वनाथ बिराजदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या ,त्यांनी यापुढेही आपण गावातील सर्व सार्वजनिक उपक्रमात अशीच आपल्या कुवतीप्रमाणे मदत करू असे अभिवचन दिले. या याप्रसंगी श्री शिवकुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद अलमला, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भागवत पाटील, माजी उपसरपंच खंडेराव कोकाटे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील, पर्यवेक्षक पी. सी.पाटील विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सूर्यवंशी भास्कर यांनी केले तर आभार शरण धाराशिवे सर यांनी मांडले.

Post a Comment

أحدث أقدم