लातूरः- संस्कार प्राथमिक विद्यालय, उदगीर येथील श्रीमती बालिका लक्ष्मणराव मुळे ह्या एक आदर्श शिक्षिका होय. 1997 मध्ये अप्रशिक्षित शिक्षकांना पत्रद्वारा प्रशिक्षण करून घेण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर शिक्षकांना एकसंघ करून 1997 मध्ये उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे विधिज्ञ पी.जी. रोडगे यांनी खूप मोठे सहकार्य केले. तर तत्कालीन माजी आमदार प्राध्यापक मनोहररावजी पटवारी साहेब यांनी देखील आझाद मैदान, मुंबई येथे माहे ऑक्टोबर 1997 मध्ये अप्रशिक्षित शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून अप्रशिक्षित कृती शिक्षक समितीचे महाराष्ट्र राज्याचे राज्यकार्य अध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी खूप मोठा लढा उभा करून १८८७-९८ मध्ये दहा हजार (१०,०००) अप्रशिक्षित शिक्षकांचे पत्रद्वारा प्रशिक्षण करून घेण्यासाठी बालाजी सुवर्णकार, नागनाथ सोमवंशी, भरत नवटके, महेश जगपुरे, यांच्यासह देवणी येथील जरीना खान पठाण, साने गुरुजी प्राथमिक विद्यालय आणि उदगीर येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती सरोजा काळे, राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयाच्या स्वर्गीय श्रीमती छायाताई जोशी, जळकोट येथील खाजा गरीबन उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सलीम बागवान, दत्ता पाटील नामदेव जावरे, बालाजी केंद्रे, नारायण नागापल्ले, श्री मोरे यांच्यासह अनेक अप्रशिक्षित शिक्षकांनी पत्रद्वारा प्रशिक्षण करून घेण्यासाठी लढा दिला होता. अखेर त्या गोष्टीला खूप मोठे यश प्राप्त झाले आहे. इ.स. 2000 मध्ये उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, सुप्रीम कोर्ट दिल्ली, व महाराष्ट्र शासनाने अखेर मनोहररावजी पटवारी यांनी शिक्षण विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरून पत्रद्वारा प्रशिक्षण करून घेण्यास भाग पाडले. त्या गोष्टीला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. श्रीमती बालिका ताई लक्ष्मणराव मुळे यांचेही कार्य शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी अतुलनीय आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, कार्याचा गौरव म्हणून लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया ओबीसी बहुजन महासंघ, श्री संत नरहरी महाराज दैवज्ञ,सोनार संघ उदगीर, श्री संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर, अखिल भारतीय सुवर्णकार समाज महाराष्ट्र राज्य, टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र, विश्वक्रांती पत्रकार महासंघाच्या च्या वतीने श्रीमती बालिका लक्ष्मणराव मुळे यांचा लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया ओबीसी बहुजन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी सन्मानपत्र व लोककलासेवा मंडळाच्या सरचिटणीस पदी श्रीमती बालिका ताई लक्ष्मणराव मुळे यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून. त्यांच्या पुढील उज्वल शैक्षणिक, सामाजिक, कार्यासाठी बालाजी सुवर्णकार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल माजी आमदार माननीय श्री प्राध्यापक मनोहररावजी पटवारी सर, लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया ओबीसी बहुजन महासंघाचे पदाधिकारी माननीय श्री राजकुमार घुले, सौ दर्शना ताई घुले, सौ. श्वेता ताई बोपचे, लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया ओबीसी बहुजन महासंघाच्या महाराष्ट्राच्या महासचिव सी. विमलताई मदने, राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुभाष तगाळे, राष्ट्रीय सचिव जाफर जाफरखान शेख बुलढाणा, टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख माननीय श्री शिवाजी निरमनाळे सर, माननीय श्री भगवानराव बिरादार उदगीर, सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका सौ. महानंदा बालाजी सुवर्णकार, अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या लातूर जिल्हाध्यक्षा, स्मिताताई पोतदार, कार्यवाह शोभाताई सुवर्णकार, १२ बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री सुधाकर रावजी दापकेकर, पुणे येथील शैक्षणिक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे माननीय श्री शिवाजी रावजी कळसे, मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक संजय जी पांचाळ, प्राध्यापक, पत्रकार जाहुरे, संत गाडगेबाबा विचाराचे दैनिक वैराग्यमूर्ती चे मयूर जी सवईकर लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया ओबीसी अल्पसंख्याक विभागाचे मराठवाडा कार्याध्यक्ष मा श्री गोलंदाज समशेर खान, यांच्यासह आदींनी त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीमती बालिका लक्ष्मणराव मुळे यांची लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया ओबीसी बहुजन महासंघाच्या लातूर जिल्ह्याच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया च्या लातूर जिल्ह्याच्या महिला सरचिटणीस पदी नियुक्ती
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق